*राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4नगरपंचायतींच्या निवडणूका जाहीर.18 ऑगस्ट रोजी मतदान
*मुंबई : राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 18 ऑगस्ट रोजी मतदान तर 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीची प्रक्रीया येत्या 20 जुलैपासून सुरु होणार आहे. 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरावी लागणार आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यात निवडणूका होणार आहे.
















