*रात्र प्रशालेतील विद्यार्थींना दर्जेदार व गुणवतापुर्ण शिक्षण मिळण्यासाठी मासूम कडून ई लर्निंग साहित्य भेट.*
संग्रामनगर दि.१० (केदार लोहकरे याजकडून) शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रात्र प्रशाला या शाळेला मासूम सामाजिक संस्थेकडून ई लर्निंग साहित्य देण्यात आले.यावेळी मासूम संघटनेचे गवस सर यांनी मासूम संघटनेची उद्दिष्टे,ध्येय,हेतू याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मासूम ही सामाजिक संस्था आसून रात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न करते.रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी,दिवसाच्या शाळेप्रमाणे त्यांनाही शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी मासूम ही सामाजिक संस्था अविरतपणे कार्य करीत आसते. मासूमच्या वतीने अकलूज येथील रात्र प्रशालेला प्रोजेक्टर,लॅपटॉप,विज्ञान प्रयोगशाळासाहित्य,ग्रंथालयासाठी पुस्तके इत्यादी साहित्याचा पुरवठा करण्यात आला.यासाठी संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील,आ.रणजितसिंह मोहिते- पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते -पाटील,संचालिका स्वरुपाराणी मोहिते -पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. रात्र प्रशाला अकलूजला मासूम संघटनेच्या संचालिका निकिता केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत गवस ,कमलाकर माने, संदीप सूर्यवंशी ,दत्तात्रेय गरड यांनी भेट देऊन सदर साहित्य प्रशाला समितीचे सभापती उत्कर्ष शेटे व प्रशालेचे मुख्याध्यापक संजय मुंगसे यांच्याकडे सुपूर्त केले.यावेळी डॉ.विजयकुमार शिंदे,प्रा.रवींद्र माने,प्रा.दिपक साळुंखे,प्रा.अनिल शिंदे,चंद्रकांत धांडोरे उपस्थित होते.







