नागरिकांनो सावधान!!!!सोशल मीडिया वरून होतेय फसवणूक
नांदेड (प्रतिनिधी )नांदेड जिल्हा पोलीस दला कडून व कंधार पोलीस ठाणे कडुन सर्व नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून, सर्वांनी सतर्क राहावे. असे आवाहन करण्यात आले. यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे.सध्या नागरीकांना फेसबुक ,मॅसेंजर, व्हॉटसअप यावर अनोळखी महीला अनोळखी नंबरवरून प्रथम मॅसेज करते, त्यामध्ये ती प्रथम चॅटींग मध्ये Hi, Hello, How are you, असे मॅसेज करते.त्यांनतर व्हिडीओ कॉल करण्यास सांगते. किंवा ती स्वत: व्हिडीओ कॉल करते. आणी व्हिडीओ कॉलमध्ये स्वता:चे अंगावरील कपडे काढते.आणी समोरच्या व्यक्तीस देखील कपडे काढण्यास सांगते. आणी त्यांनतर ती व्हिडीओ कॉलमध्ये ती महीला अश्लील चाळे करते. व हा सर्व प्रकार करत असताना त्याची स्कीन रेकॉर्डींग केली जाते. आणी त्याचा व्हिडीओ तयार करून तो व्हिडीओ मोबाईलवर पाठवला जातो. आणी तो व्हिडीओ आपले जवळचे नातेवाईक, मित्र यांना पाठवणार नाही असे सांगुन पैशाची मागणी केली जाते. आणि पैसे देण्यास नकार दिल्यास तो अश्लील व्हिडीओ नातेवाईकांना, मित्रांना, तसेच सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. असे प्रकार मोठया प्रमाणात वाढले आहेत. व आशा तकारी पोलीस ठाणेस येत आहेत. तरी सर्व नागरीकांना विंनती आहे. की आपण आपल्या मोबाईल वरून फेसबुक, मॅसेंजर, व्हॉटसअप यावरून कोणत्याही अनोळखी नंबस्वर चॅटींग करूनये किंवा त्यांचे व्हिडीओ कॉल रिसिव्ह करू नयेत. आशा नंबरवरून कॉल आल्यास तो नंबर तात्काळ ब्लॉक लिस्ट मध्ये टाकावा. आपल्या मोबाईल मध्ये कोणत्याही नंबरवरून आलेल्या लिंक ओपण करू नये. तसेच कोणीही आपणास आपल्या बॅक खात्याची , ए.टी.एम. कार्डची माहीती, ओ.टी.पी. ईत्यादी माहीती विचारल्यास ती त्यांना देवु नये.मोबाईल मधील ज्या ऍप चा वापर आपण करत नाही असे अँप आपल्या मोबाईल मधुन काढून टाकावेत अशी विनंती करण्यात आली आहे.आशा प्रकारची फसवणूक भरपूर प्रमाणात सोशल मीडिया मध्ये होत आहे.दक्ष राहा अनोळखी व्यक्ती पासून सावधान. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.







