*यशवंतनगर जिल्हा परिषद केंद्रशाळेत बाळगोपाळांचा दिंडी पालखी सोहळा संपन्न.*
संग्रामनगर दि.३ (केदार लोहकरे याजकडून)माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत आज बाळगोपाळांचा दिंडी पालखी सोहळा ग्यानबा तुकाराम,ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषात पालखी सोहळा संपन्न झाला. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच्या आगमानापुर्वी वातावरण निर्मिती आज किर्तीनगर,अर्जुननगर,विजयकॉलनी परिसरात लहान मुलांनी छोटीशी दिंडी पायी चालत लोकांची मने जिंकली.या पालखी सोहळात लहान मुलांनी संतांची वेशभूषा व इतर मुलांनी वारक-यांचे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते.त्यामुळे पालखी आगमनापूर्वीची एक वेगळेच वातावरण निर्मिती झाली होती.
या पालखीमध्ये उपस्थित मुलांना गोपीचंद,अष्टगंध,बुक्का लावण्याचे काम नागनाथ क्षीरसागर सर,भोसले मॅडम,नष्टे मॅडम शेख मॅडम यांनी तर चोपडे मॅडम यांनी हस्ते निर्मिती केलेल्या विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींचे पूजन मुख्याध्यापक खडतरे सर व जरे मॅडम यांनी केले तर आरती भक्ती नाचणे मॅडम यांनी म्हटली.सर्व शिक्षकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत म्हणत पालखी पुढील प्रवासास निघाली.अनेक अभंग भारुड विठ्ठलाचा जय घोष काळे सरांनी गायन केले परिसरातील पालकांनी पालखी थांबवून पूजा करून दर्शन घेतले चालून चालून दमलेल्या छोट्या वारकऱ्यांना पिंटू चौगुले परिवार यांच्याकडून अल्पोपहार देण्यात आला.नाश्ता करून सर्व छोटे माऊली पुढे जय घोषात जात असताना विस्तार आधिकारी सायरा मुलाणी मॅडम यांनी अचानक भेट दिली मुलांचे कौतुक केले.त्याच बरोबर अनेक पालकांनी मुलांना खाऊ दिला.माजी विद्यार्थी समर्थ क्षीरसागर यांच्या पालकांनी सर्व मुलांना चॉकलेटचे 10 पुडे दिले. चालत चालत पालखी सोहळा शाळेच्या मैदानात पोहोचला.गोल रिंगण सोहळा करून शेवट खिचडी भात खाऊन कार्यक्रम संपन्न झाला.











