*पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे वतीने जागतिक डॉक्टर्स दिवस पुण्यात साजरा…*
आज पुणे येथे पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्या वतीने जागतिक डॉक्टर्स दिवसानिमित्त नवोदित डॉक्टरांचा सन्मान करत डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला.ज्य होमिओपॅथिक डॉक्टरांनी नवीन दवाखाना सुरू केला आहे अशांचा संघटनेच्या वतीने पुस्तक भेट व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला व भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासकीय सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांनी होमिओपॅथिचा प्रचार व प्रसारासाठी समाज प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे सांगत होमिओपॅथिक डॉक्टरांच्या स्वाभिमानासाठी शासन दरबारी होमिओपॅथिचे नेते डॉ.अरुण भस्मे सर व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत असल्याचे सांगितले.यावेळी पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अजय तायडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी डॉ.राजकुमार अंबड, डॉ.निलेश सावंत, डॉ.महेश पाटील, डॉ.जयंत खोरे इनामदार, डॉ.ज्ञानेश्वर उगले, डॉ.कांचन राऊत, डॉ. कविता वाघ, बाळासाहेब शिंदे इ.उपस्थित होते.













