होमिओपॅथिक डॉक्टरांवर अन्याय होवू देणार नाही… पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार…
पुणे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात ज्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी सेवा दिली होती अशांना पुणे महापालिकेच्या वतीने सेवा समाप्तीच्या नोटीसा बजावल्या होत्या,परंतु पुणे मनपाचे तत्कालीन सदस्य डॉ.सिद्धार्थ धेंडे व बापूसाहेब कर्णे गुरुजी यांनी पुणे मनपा विषय क्रमांक 19/458, ठराव क्रमांक 662 (दि.22/11/2021)नुसार होमिओपॅथिक डॉक्टरांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत जबाबदारी देण्याचा ठराव मंजूर केलेला असताना या नोटीसा चुकीच्या पद्धतीने दिल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आणून दिले,तसेच होमिओपॅथिक डॉक्टरांना बायोमेडिकल हे बंधनकारक नसून चुकीच्या पद्धतीने त्याची आकारणी होत असल्याचे सांगितले या दोन्ही प्रश्नांवर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन मा.आयुक्त विक्रम कुमार यांनी शिष्टमंडळाला दिले.सदर शिष्टमंडळात पुणे मनपाचे मा.उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य डॉ बाळकृष्ण गायकवाड, पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अजय तायडे, डॉ. सिद्धार्थ वाघमारे, डॉ. नयना सोनवणे (खिलारे), डॉ.दयानंद पवार हे होते..











