• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री, जाणून घ्या एकनाथ शिंदेचा प्रवास

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 30, 2022
in राजकारण
0
रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री, जाणून घ्या एकनाथ शिंदेचा प्रवास
0
SHARES
153
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री, जाणून घ्या एकनाथ शिंदेचा प्रवास

*एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारविरोधात बंड करून बंडखोर आमदारांचा गट तयार केला आणि आज राज्याच्या सत्तेत मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचले आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत अशी बंडखोरी होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. यापूर्वीही बंडखोरी झाली, पण काहींनी स्वत:चा पक्ष काढला तर काहींनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. शिंदे यांनी संपूर्ण शिवसेनेला हायजॅक केली. आज ते मुख्यमंत्रीपदावर गेले आहे. शिंदे यांचे जीवन आणि त्यांचा राजकारणाचा प्रवास राज्याच्या राजकारणाचे ट्रम्प कार्ड कसे ठरले, जाणून घेऊ. *तेव्हा शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा होती*2019 मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी चर्चा होती. कारण जशी परंपरा होती, बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवरूनच सत्ता आणि संघटन पाहत असत, उद्धवही तोच मार्ग अवलंबतील. 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. पण उद्धव ठाकरे यांच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील एका व्यक्तीने मातोश्रीबाहेर येऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री झाले. *शिंदे यांचा जीवनप्रवास*एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 सालचा. सातारा हे त्यांचं जन्मस्थान. मात्र बालवयातच त्यांनी गाव सोडलं आणि ठाण्यात स्थायिक झाले. शिंदे आज 58 वर्षांचे असून त्यांनी आपल्या शालेय जीवनाची सुरुवात ठाण्यातून केली. येथे ते सुरुवातीला ऑटो रिक्षा चालवत असे. त्यादरम्यान त्यांनी शिवसेना नेते आनंद दिघे यांची भेट घेतली, ही भेट टर्निंग पॉइंट ठरली. शिंदे यांची राजकीय कारकीर्द वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी सुरू झाली. *1997 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकली*1997 मध्ये ते ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर 2001 मध्ये ते ठाणे महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते झाले. नगरसेवक असताना एका अपघातात त्यांनी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी गमावली. त्यांचा दुसरा मुलगा श्रीकांत त्यावेळी 13 वर्षांचा होता. श्रीकांत हे आज शिवसेनेचा खासदार आहेत. *नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर संधी उपलब्ध*एकनाथ शिंदे यांची राजकीय पकड आणि दूरदृष्टीने हळूहळू शिवसेनेत पकड निर्माण होऊ लागली. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा शिंदे यांनी पक्षातील आपली प्रतिष्ठा वाढवण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना खूप चांगल्या संधीही मिळाल्या आणि ते पूर्ण निष्ठेने पुढे जाऊ लागले. त्यानंतर पुत्र उद्धव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत बाळासाहेबांसाठी अडचणी निर्माण झाल्या, तेव्हा एकनाथ शिंदे यांची ठाकरे कुटुंबाशी जवळीक वाढू लागली. *कामाने विश्वास जिंकला आणि तिकीट मिळवले*2004 ची विधानसभा निवडणूक ठाण्यातून लढण्यासाठी त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाले. हे तिकीट केवळ निवडणुकीचे नव्हते, तर हे तिकीट त्यांचा राजकीय प्रवास यशस्वी करण्यासाठी होते. 2004 मध्ये त्यांनी ठाण्यातून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2009 मध्येही निवडणूक जिंकली. त्यांनी 2014 आणि 2019 मध्येही विजयाची अशीच कहाणी सुरु ठेवली. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीही राहिले आहेत. राजकारणी जेव्हा उंचावतात तेव्हा गुन्हेगारी प्रकरणेही पाठ सोडत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यावर 18 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे 11 कोटी 56 लाखांहून अधिक संपत्ती आहे. यामध्ये 2.10 कोटींची जंगम मालमत्ता आणि 9.45 कोटींची स्थावर मालमत्ता जाहीर करण्यात आली. *शिंदे यांच्या नेतृत्वावर बंडखोरांचा विश्वास*शिंदे यांच्यातील नेतृत्वगुण हा त्यांचा यूएसपी आहे. किंबहुना त्यांनी रस्त्यावरून सत्तेपर्यंतचा संघर्ष पाहिला आहे. नेतृत्वाच्या या गुणांमुळे शिंदे यांनी ठाकरे सरकारमधून बाहेर पडले आपल्या उद्दिष्टात नक्कीच यश येईल, असा विश्वास बंडखोर आमदारांना वाटत होता. यामुळेच एक एक करून अनेक आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले होते. आता ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. अशा स्थितीत शिंदे यांचा दर्जा किती वाढतो, राज्याच्या राजकारणात त्यांची भूमीका किती ताकतवान आहे, हे येणारा काळच सांगेल, पण आज शिंदे हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्ती झाले आहेत.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
डॉ . विद्युतचंद्र गोविंददास शहा (अकलूज,)) यांना भारत रत्न डॉ. बी.आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर:

डॉ . विद्युतचंद्र गोविंददास शहा (अकलूज,)) यांना भारत रत्न डॉ. बी.आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर:

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In