*महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल (MSPC) निवडणुकीमध्ये MSCDA पॅनल चा दणदणीत विजय
नुकत्याच झालेल्या MSPC च्या निवडणुकीत MSCDA पॅनल चे 6 च्या 6 उमेदवार हे विजय झालेले आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यभरातून 2,80,503 रजिस्टर्ड फार्मासिस्ट मतदान करतात, यामध्ये 35 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते यापैकी 6 उमेदवार निवडले जातात , ही निवडणूक 5 वर्षातून एकदा घेण्यात येते. MSCDA पॅनल चे पॅनल प्रमुख मा.श्री.जगन्नाथ आप्पा शिंदे ( अध्यक्ष,ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन) तसेच मा.श्री.मदन पाटील( संघटन सचिव MSCDA) यांच्या नेतृत्वाखाली *पॅनल चे एकच उद्दीष्ट -फर्मासिस्टचे उज्वल भविष्य* ही टॅग लाईन वापरून निवडणूक पार पडली. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मधून निवडणूक लढवणारे MSPC चे माजी अध्यक्ष मा.श्री.विजय पांडुरंग पाटील यांचा पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे. या निवडणुकीसाठी मोलाची कामगिरी बजावणारे मा.श्री. बसवराज मणुरे (अध्यक्ष,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन), मा.श्री.सिद्धेश्वर घाळे (उपाध्यक्ष,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन),मा. श्री. राजशेखर बारोळे (सचिव,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन),मा.श्री. राजेश विरपे (खजिनदार,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन) तसेच माळशिरस तालुक्यातून विठ्ठल गायकवाड, शंकर पवार,विजय जगताप, रणजित महाडिक पाटील,प्रदीप भोरे,रवी जगताप, अशपाक मुलाणी, शुभम पवार,सुधीर केमकर,पृथ्वीराज जाधव,अमोल जवंजाळ,बाळू जाधव यांनी पॅनल निवडून आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.या केलेल्या कामाची दखल घेऊन मा. श्री. जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी माळशिरस तालुक्यातील टीम ला मुंबई ला बोलवून कौतुक करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या











