*अदनान सामी 220 किलोवरून 75 किलो? 16 महिन्यांत 150 किलो वजन कसे केले कमी…
*मुंबई – सोशल मिडीयावर बदललेल्या अदनान सामीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. अदनान सामीचे नवीन रूप पाहून चाहत्यांना त्यावर विश्वास बसत नाही. नव्या फोटोंमध्ये अदनान सामी हिरोपेक्षा कमी दिसत नाही. सगळीकडे फक्त अदनान सामीच्या फिट बॉडी आणि गुड लूकचीच चर्चा होत आहे. अदनान सामीचे नवीन रूप चाहत्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. गायकाचा फिटनेस पाहून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. तुम्हाला आठवत असेल, अदनान सामी एकेकाळी त्याच्या लठ्ठपणासाठी ओळखला जात होता. त्यावेळी त्याचे वजन सुमारे 220 किलोपर्यंत पोहोचले होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे त्याला खूप टोमणेही ऐकावे लागत. पण असं म्हणतात की काहीही अशक्य नाही आणि जे प्रयत्न करतात ते कधीच हार मानत नाहीत. अदनान सामीनेही आपल्या जबरदस्त परिवर्तनाने जगासमोर एक आदर्श ठेवला आहे आणि तो त्याच्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. मात्र अदनान सामीने स्वतःमध्ये कसा बदल केला? जाणून घेऊयात… अदनान सामीला त्याच्या ‘मुझको भी तू लिफ्ट करा दे’ या गाण्याने गायक म्हणून लोकप्रियता मिळाली. त्यावेळी त्याचे गाणे चार्टबीटमध्ये प्रथम क्रमांकावर होते, मात्र सर्वांनीच या गायकाच्या लठ्ठपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अदनानला अनेकवेळा बॉडी शेमिंजचा सामना करावा लागला आहे. पण या सगळ्याकडे लक्ष न देता तो एकामागून एक हिट गाणी देत राहिला.पण 2005 मध्ये अदनान सामी अचानक शोबिझच्या प्रकाशझोतात गायब झाला. अदनानवर यावर्षी लिम्फेडेमाची शस्त्रक्रिया झाली. यानंतर त्याला सुमारे 3 महिने बेड विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. एकवेळ लठ्ठपणामुळे अदनानला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला इशारा दिला होता की, जर त्याने वजन कमी केले नाही तर तो 6 महिन्यांहून अधिक जगू शकणार नाही आणि येथून अदनान सामीचा परिवर्तनाचा प्रवास सुरू झाला. अदनानने त्याच्या एका मुलाखतीत याबाबत सांगितले होते. त्याने सांगितले की, वजन कमी करण्याचे काम 80 टक्के मानसिक आणि 20 टक्के शारीरिक होते. स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी कठोर परिश्रम आणि उत्कटतेने, अदनानने 16 महिन्यांत सुमारे 150 किलो वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. फॅटने फिट झालेल्या अदनानला पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आजही प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे की, गायकाने एवढे वजन कसे कमी केले. चला, तर मग त्याचा डाएट प्लान जाणून घेऊयात…रिपोर्टनुसार, अदनानच्या न्यूट्रिशनिस्टनी त्याला लो कॅलरी आहार चार्ट दिला होता, त्यानुसार, गायकाला पांढरा भात, ब्रेड आणि जंक फूड खाण्यास सक्त मनाई होती. न्यूट्रिशनिस्टने अदनानला फक्त सॅलड, मासे आणि उकडलेली मसूर खाण्यास सांगितले होते.वजन कमी करण्याच्या प्रवासात अदनानच्या दिवसाची सुरुवात शुगर फ्री चहाने झाली. दुपारच्या जेवणात भाजी, कोशिंबीर आणि काही मासे खात असे. रात्रीच्या जेवणात फक्त साधी उकडलेली मसूर किंवा चिकन तो खाता होता. यासोबत चपाती किंवा भात वर्ज्य होता. स्नॅक्समध्ये, अदनानला फक्त कोरडे होममेड पॉपकॉर्न खाण्याची परवानगी होती.एक काळ असा होता की, अदनानचे वजन इतके वाढले होते की त्याला वाकूनही काही उचलता येत नव्हते. शरीरातील ताणामुळे अदनान जिम करण्याच्या स्थितीतही नव्हता, कारण त्याला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका होता. मात्र 40 किलो वजन कमी केल्यानंतर अदनानला ट्रेडमिल वापरण्याचा आणि हलका व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर अदनान आठवड्यातून 6 दिवस कार्डिओ व्यायाम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचा. अशाप्रकारे, अदनानचे वजन कमी होऊ लागले आणि अशा प्रकारे तो 220 किलोवरून 75 किलो झाले







