*कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांच्यावतीने नूतन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
कोल्हापूर श्री.एस.सी.चांडकसो यांचा जाहीर सत्कार*
संग्रामनगर दि.२७ (केदार लोहकरे याजकडून)कोल्हापूर जिल्हा न्यायालय येथे नवीन पदभार स्वीकारलेले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशसो,श्री.एस.सी.चांडक यांचा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.एस.सी.चांडक यांचा फेटा,शाल,श्रीफळ, राजर्षी शाहू ग्रंथ देऊन सत्कार करणेत आला.यावेळी नूतन न्यायधीश एस.पी.गोंधळेकर,ए.बी.धुळधुळे,एस.ए.बाफना,एस.ए.गुप्ता,एस.डी.शिरसाट,ए.एस.व्यास यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला. यावेळी बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य अॅड.विवेक घाटगे म्हणाले की,बार आणि बेंच मध्ये समन्वय साधून जलद न्यायदानाचे काम करू.कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन सक्षम वकिलांचा बार आहे. पक्षकाराना जलद न्याय देणेकरिता समन्वयाचे प्रयत्न करू. यावेळी प्रमुख सत्कारमूर्ती प्रमुख जिल्हा न्यायाधीशसो श्री.एस. सी.चांडक यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,कोल्हापूर जिल्ह्यात न्यायाची पार्श्वभूमी आहे.बार आणि बेंच समन्वयाने पक्षकारास जलद न्याय मिळणेकरिता सर्वतोपरी प्रयन्त करू.आत्मविश्वासाने काम केले की विश्वास आपोआप निर्माण होतो. पक्षकाराचे जुने 10 ते 12 वर्षे प्रलंबित असलेले दावे लवकरात लवकर चालवून जलद न्यायदानाचे काम करू या.सध्या जिल्हा न्यायालयात असलेली न्यायाधीशांची टीम सक्षम आहे त्यामुळे न्यायादानाचे काम चांगले होईल असा विश्वास आहे.कोल्हापूर शाहू व करवीर निवासिनी आई महालक्ष्मीच्या नगरीत काम करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य मानतो. सदर कार्यक्रमास जिल्हा न्यायधीश क्र.१ श्रीमती.पी.एफ. सय्यदसो,कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण,सेक्रेटरी अॅड.विजयकुमार ताटे- देशमुख जॉईंट सेक्रेटरी अॅड.संदीप चौगुले,अॅड.तृप्ती नलवडे,अॅड.संकेत सावर्डेकर,अॅड.सुशांत चेंडके.संदीप मालेकर,अॅड.के.ए.कापसे,अॅड.पी.आर.पाटील,अॅड.राजेंद्र किंकर,अॅड.नारायण बांदिगरे इ.तसेच सर्व सन्मानीय न्यायधीशवर्ग व सन्मानीय वकील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख यांनी केली.आभार प्रदर्शन जॉईंट सेक्रेटरी अॅड.संदीप चौगुले यांनी मानले.







