*राजर्षीं शाहू छत्रपती महाराज हे खरे न्यायप्रिय राजा.अॅड विवेक घाटगे*
कोल्हापूर दि.२५ (केदार लोहकरे याजकडून)कोल्हापूर बार असोसिएशन वतीने राजर्षीं शाहू महाराज जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अॅड.विवेक घाटगे बोलत होते. अॅड.विवेक घाटगे यांनी लोकराजा राजर्षीं शाहू छत्रपती महाराज यांचे जीवन कार्याविषयी विचार मांडताना म्हणाले की,राजर्षीं शाहू यांना कमी जीवन आयुष्य मिळून देखील त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात राजर्षीं शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पूजन जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ श्रीमती पी.एफ.सय्यद व अध्यक्ष अॅड गिरीश खडके यांचे शुभ हस्ते करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले ते पुढे म्हणाले की,शाहू महाराजांनी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता २८ वस्तीगृहांची स्थापना केली.तसेच प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा पाहिला राजा शाहू महाराज होते.शाहू महाराजांनी त्याकाळी केलेले विधवा पुनर्विवाह व इतर कायदे शंभर वर्षे पुढील दुरदृष्टी ठेऊन केले गेले.आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुनर्विवाह,विधवांना सन्मानबाबत ग्रामपंचायतमध्ये होणारे ठराव म्हणजे खरी शाहू महाराज यांचे विचार अंगीकारणे होय.छत्रपती शाहू महाराज हे जलसंपत्ती,उद्योग,रोजगार, देणारा पाहिला दूरदृष्टी राजा होता. तसेच कोल्हापुरात रेल्वे प्रस्ताव आले नंतर चार वर्षात कोल्हापूर रेल्वे धावली याचे श्रेय शाहू महाराजांना जाते . या व्याख्यानाच्या कार्यक्रमास बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके,उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण,अॅड.महादेवराव अडगुळे माजी अध्यक्ष महाराष्ट्र अँड गोवा,अॅड.प्रकाश मोरे,अॅड.संदीप चौगुले,अॅड.तृप्ती नलवडे,अॅड.सुशांत चेंडकेअॅड.अरूण शिंदे,सन्मानीय न्यायाधीश,सर्व सभासद वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक व स्वागत कोल्हापूर बार असोसिएशनचे सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अॅड.संदीप चौगुले यांनी मानले.







