इलेक्ट्रॉनिक मीडियाला विठुरायाचा विसर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, तुकाराम महाराज नॉट रीचेबल फक्त एकनाथ शिंदे रिचेबल
अकलूज (प्रतिनिधी)महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. शेकडो वर्षापासून संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारीला पंढरपूर ला येत असतात. कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात शासनाने पायी वारीला परवानगी न दिल्यामुळे हा सोहळा होऊ शकला नाही.यावर्षी निर्बंध शिथिल झाल्यामुळे पायी वारीला परवानगी देण्यात आली आहे. या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सामील होत असतात. परंतु काही कारणामुळे पायी वारीत सामील न झालेले भक्त टी. व्ही च्या माध्यमातून याची देही याची डोळा हा सोहळा पाहत असतात.20जून आणि 21जून ला पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले असून, टी. व्ही चॅनेल ला मात्र या सोहळ्याचे वावडे आहे की काय? अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरी ची लागण झाली असून, जवळपास सर्वच न्यूज चॅनेल वरून रात्रंदिवस राजकारणाच्या बातम्या दाखवील्या जात आहेत. त्यामुळे भाविकातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.प्रतिवर्षी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या प्रसार माध्यमातून यंदा मात्र प्रस्थान सोहळा असो किंवा पालखी सोहळा असो याची बातमी दाखवल्याचे दिसून आले माही.राजकारणाच्या या गदारोळात सर्व मीडियाला ज्ञानोबाराय आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा पूर्ण विसर पडला आहे. हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया युवक मित्र ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केली आहे.शिवसेनेतून बंड पुकारत बाहेर गेलेले एकनाथ मात्र २४ तास प्रसारमाध्यमांच्या पडद्यावर दिसत आहेत, महाराष्ट्रात सुरू असलेली राजकिय अराजकता दाखव ण्या तुन प्रसार माध्यमांना वेळच मिळत नाही म्हणूनच सामान्य जनतेला हाच प्रश्न विचारात पडतो आहे की या सगळ्या पुढ महाराष्ट्रच दैवत असणाऱया पांडुरगाचा आणि महाराष्ट्राची संस्कृती अबाधित राखणाऱ्या संत मडळींचा विसर तर पडला नाही ना? वारीला जाऊ न शकणारे विठुरायाचे भक्त. टी. व्ही च्या माध्यमातून वारीच दर्शन चेत असतात ,पण यावर्षी राजकिय बंडाळी दाखवण्यात प्रसारमाध्यमे च्यस्त आहेत. म्हणूनच सोशल मीडियावर प्रसार माध्यमाना विठुरायचा विसर,निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, तुकाराम नॉट रिचेबल, अशा मिम्स फिरताना दिसत आहेत.महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे काय चालू आहे. त्याबद्दल व्यक्त होणे माझा विषय नाही. पण या सगळ्यात ज्ञानोबा -तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा आनंदोत्सव एकाही न्यूज चॅनेल वर एकही मिनिट दिसत नाही. हे क्लेशदायक आहे.रिपोर्टर शिल्लक असतील तर थोडे पालखी मार्गांवर पाठवावे. पालखी वर्षातून एकदाच येते. राजकारण रोजच चालू आहे. माऊली. माऊली.अशा प्रकारच्या संतप्त मिम्स सोशल मीडिया वरून व्हायरल होत आहेत.सध्या केवळ टीव्हीवरीलसर्व न्यूज चैनल वरशिवसेनेची बंडखोरीआणि महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चायाविषयीच्या बातम्यादिवसभरात दाखविल्या जात आहेत..भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन चाललेला पालखी सोहळा जणू चैनल वरून गायबच झालाय..पालखी सोहळ्या चे दर्शन दुर्लभ ?कोरोना वाढत आहे.असे चॅनल वरून सांगितले जात होते..या चार दिवसातील आकडेवारीची माहिती मिळू शकेल काय ?सर्वसामान्यांचे प्रश्नमहाराष्ट्रात तथा देश तथा जागतिक पातळीवर घडत असलेल्या इतर गोष्टीगायब…या गोष्टींची टीव्ही चॅनल दखल घेतील काय ?अशा संतप्त भावना नागरिकांमधून उमटत आहेत.












