*विधानसभा बरखास्त होणार?, संजय राऊतांचे सूचक ट्वीट*
मुंबई : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केल्यानंतर राज्य सरकार संकटात सापडले आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक ट्वीट केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असे ट्वीट राऊतांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदाचा राजीनामा देऊ शकतात, असा या ट्वीटचा अर्थ होतो. त्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विटर बायोमधून पर्यावरण मंत्रीपद हटवले आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आमदार, काही अपक्ष आमदार हे सुरतला गेले होते. त्यानंतर ते आता तेथून थेट गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारणात भूकंप आला आहे. सर्वच पक्षांकडून राजकीय बैठका सुरू झाल्या आहेत. संजय राऊत यांनी शिवसेनेने अनेकदा राखेतून जन्म घेत गुरुडझेप घेतली असल्याचे म्हटले आहे. भाजपचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली आहे आहे. भाजपही अॅक्शन मोडमध्ये असून, संख्याबळाची तपासण्याचे पक्षश्रेष्ठींची आदेश फडणवीसांना आला आहे. तर राष्ट्रवादीमध्ये बैठक झाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची शरद पवारांसोबत सिल्वर ओक बंगल्यावर बैठक झाली आहे.





