*संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे ” बलराज” या अश्वाचे अकलुजहुन श्री क्षेत्र देहुकडे प्रस्थान*. संग्रामनगर दि.१९ (केदार लोहकरे याजकडून)संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागले आहेत.गेले दोन वर्षे कोरोनामुळे शेकडो वर्षांची वारीची परंपरा खंडित झाली होती.पालखी सोहळा रद्द झाला होता.मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहीते पाटील यांचा अश्व पद्मजादेवी मोहिते पाटील यांचे हस्ते विधीवत पुजा करून श्री क्षेत्र देहुकडे रवाना करण्यात आला.यावेळी माहिती देताना.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहीते पाटील म्हणाल्या कि,संतश्रेष्ठ श्री.तुकाराम महाराजांचे पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी दरवर्षी अश्व पाठवला जातो. लोकनेते प्रतापसिंह मोहीते पाटील यांचे पश्चात डाँ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी हि परंपरा पुढे चालू ठेवली आहे.गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावमुळे आषाढी वारी सेवेसाठी अश्व पाठवु शकलो नाही.परंतु यावर्षी मोठ्या उत्साहात अश्व पाठवला आहे. दरवर्षी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखीसाठी अकलूजवरुन अश्व श्री क्षेत्र देहूकडे रवाना होतो या वर्षी महाराणा प्रताप यांचे “चेतक” या अश्वाचा वंशज असलेल्या संपूर्ण भारतातील सर्वोकृष्ट अशा “जयराज” या अश्वाचा वंशज असलेला “बलराज” हा अश्व या सोहळ्यात सहभागी होणार आहे.संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री.तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात रिंगणाच्या अश्वसेवेची जबाबदारी मोहिते पाटलांकडे असते.मानाच्या रिंगण सोहळ्यात मोहिते पाटलांचा अश्व भगवी पताका घेऊन धावतो.गेल्या 40 वर्षांपासून मोहिते पाटील परिवाराकडून ही सेवा सुरु आहे.देहु ते पंढरपूर पालखी सोहळ्यात अश्व रिंगणासाठी मानाचे बाभूळकरांचे अश्वाबरोबर पताका धारी अश्वसेवेचा मान लोकनेते प्रतापसिंह मोहीते पाटील यांचे अश्वाला आहे.वारीला पाठवण्या पुर्वी 1 महिना अगोदर तयारी केली जाते दररोज सराव घेतला जातो दररोज तेलाने मालीश केली जाते,दररोज विशेष खुराख दिला जातो.पालखी सोहळ्याचे एक दिवस अगोदर अश्वाची विधीवत पूजा करुन श्री क्षेत्र देहुकडे अश्व रवाना केला जातो. यावेळी माणिकराव मिसाळ,अण्णासाहेब इनामदार,सतीश नाना पालकर अण्णासाहेब शिंदे,सुधीर रास्ते,नवनाथ साठे,रणजित देशमुख राजाभाऊ गुळवे, धनाजी साखळकर,मयुर माने,संजय गाडे,विकास शिंदे,सतीश साठे,जुल्कर शेख,राजाभाऊ निकाळजे,विठ्ठल माने,स्वराज पालकर,नेताजी काळकुटे,वैभव गायकवाड,हसन शेख,संग्राम भोसलेनिखील फुले,फिरोज देशमुख,जयसिंग मोरे,रघुनाथ साठेमंगेश साठे,विजय सांळुखे उपस्थित होते.











