वंध्यत्वावर होमिओपॅथिक औषधोपचार प्रभावी … प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ.दिपक जगताप.
.पुणे:- हाॅटेल “ऑरबिट” येथे भार्गव फायटोलॅब, दिल्ली या होमिओपॅथिक औषध निर्माण कंपने 100 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल “संपर्क “अभियान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ज्येष्ठ होमिओपॅथि तज्ञ डाॅ.दीपक जगताप यांचे वंध्यत्वावर होमिओपॅथिक औषधोपचार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डाॅ.जगताप यांनी स्लाईड्स द्वारे “वंध्यत्व ” या विषयावर 1तास मार्गदर्शन केले. त्यावेळी डाॅ.वृषाली जगताप यांनीही वंध्यत्वावर मात करण्यासाठी होमिओपॅथिक औषधांचे योगदान सिद्ध करणारे अनुभव केसेस सह कथन केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरण पार पडलेल्या या कार्यशाळेत मोठ्या प्रमाणावर पुण्यातील होमिओपॅथि डाॅक्टर्स उपस्थित होते. कोरोना काळात बंद पडलेल्या कार्यशाळा अडीच वर्षांनंतर सूरू झाल्याबद्दल सर्व उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. या प्रसंगि ज्येष्ठ होमिओपॅथि तज्ञ डाॅ.संजीव डोळे, डाॅ.अरूण महाजन, डाॅ.अमोल मुळे, डॉ.नयना सोनव, डॉ.राजकुमार अंबड,डाॅ.विश्वास बिनावडे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्र होमिओपॅथि कौन्सिलचे प्रशासकीय सदस्य डाॅ. बाळकृष्ण गायकवाड यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात होमिओपॅथि पोहोचविण्यासाठी भविष्यकालीन उपाययोजना विषयी माहिती दिली. भार्गव फायटोलॅब च्या वतीने पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार असलेल्या “व्हाओ व्ही ॲप” चे यावेळी अनावरण करण्यात आले. दिल्लीस्थीत इश्मिता कौर आणि वसिष्ठ यांनी याबद्दल माहीती दिली. कार्यशाळेत 200 होमिओपॅथिक डॉक्टरांनी सहभाग घेतला. श्री.अमर कुमठेकर, श्री.कुलदीप खलाटे, श्री.सत्यवान वाघोले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.




















