उच्च माध्यमिक परीक्षेत शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे घवघवीत यश.
अकलूज (प्रतिनिधी )पुणे विभागीय शिक्षण मंडळा तर्फे मार्च 2022मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले इयत्ता 12वी कॉमर्स विभागामध्ये महाविद्यालयातून 85.50टक्के गुण मिळवून हितेश अमित पुंज हा विद्यार्थी प्रथम तर संस्थे मध्ये तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर महाविद्यालयातून मयुरी पवार द्वितीय तर पवन जाधव तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.कष्ट,जिद्द, तसेच शिक्षक व कुटुंबीय यांच्या मार्गदर्शना मुळे विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन करून प्राचार्य दत्तात्रय बागडे यांच्या शुभ हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव केला.यावेळी प्राचार्य दत्तात्रय बागडे, कार्यालय अधीक्षक मालुसरे,वाणिज्य विभाग प्रमुख जाधव ए. डी., शिंदे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.














