अकलूज येथे निषेध मोर्चा मध्ये” न भुतो न भविष्य तो “असे लक्षणीय मुस्लिम समाजाचा सहभाग——नुपुर शर्मा बाबत सर्वत्र संतापाची लाट
भारतीय जनता पार्टीच्या नुपुर शर्मा व नवीन जिंदाल यांनी Times Now या टेलिव्हिजन चॅनेलवर डिबेट मध्ये इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अभद्र भाषा वापरून गलिच्छ शब्दात त्यांचा अवमान केला त्यामुळे समस्त जगातील मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या मुळे मागील काही दिवसापासून देशातच नव्हे तर जगभरातून नुपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर केवळ निलंबन नको कठोर कारवाई करून अटक करावी या मागणीसाठी सर्व स्तरातून निषेध मोर्चे आंदोलने होत आहेत त्या अनुषंगाने आज अकलूज येथे अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा अकलूज येथील नगरपरिषदे पासून सुरुवात होऊन तो मोर्चा हनुमान मंदिर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने एसटी स्टँड, सदभाऊ चौक ,नवीन एसटी स्टँड, मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहोचला याप्रसंगी मोर्चामध्ये इस्लाम जिंदाबाद ,नुपुर शर्मा नवीन जिंदल मुर्दाबाद ,आणि नुपुर शर्मा व नवीन जिंदाल यांना अटक करा अशा घोषणा देण्यात आल्या या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता नुपुर शर्माच्या त्या वक्तव्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये याबाबत संताप व्यक्त होत होता या निषेध मोर्चा मध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम समाजाची संख्या इतकी होती की आज तागायत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा पाहून अकलूज च्या नागरिकांमध्ये एकच चर्चा होती या मोर्चात” न भुतो भविष्यतो” अशी संख्या मोर्चात होती हा मोर्चा अकलूज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर तेथे निषेध सभा घेण्यात आली याप्रसंगी निषेध व्यक्त करताना सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की भाजपच्या प्रवक्त्या विरुद्ध मोर्चा काढला म्हणून त्यांची घरे बुलडोजर ने पाडण्याचे पाप त्या सरकारने केले असून ही अन्याय कारक घटना आहे तरी ज्या प्रवक्त्याने पैगंबरां बाबत अपशब्द केले त्यांच्या घरावर शासनाने बुलडोझर चालवला पाहिजे आणि मुस्लिम समाजाचे घरे बुलडोझर ने पाडली त्यांची घरे शासनाने बांधून द्यावी अशी मागणी केली याप्रसंगी भाजपा नेते धैर्यशील मोहिते-पाटील ,अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील,राष्ट्रवादी चे उत्तमराव जानकर,वंचित बहुजन आघाडी ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मराठा सेवा संघ ,बहुजन ब्रिगेड संघ, युवा सेना, अकलूज व्यापारी संघटना, पत्रकार संघटना, आदींच्या वतीने निषेध मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. सदर प्रसंगी किरण साठे ,अभिजीत गायकवाड, ॲड.अविनाश काले ,शेखर खिलारे, मौलाना तय्यब, मुक्तार कोरबु, आदिनी आपल्या भाषणातून त्या घटनेचा निषेध व्यक्त केला या निषेध मोर्चास अकलूज आणि परिसरातील सर्व स्तरातील नागरिक ,विविध संस्था संघटनानी अकलूज स्वेच्छेने बंद ठेऊन जे सहाकार्य केले त्याबाबत अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानले याप्रसंगी अकलूज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता हा मोर्चा शांततेत पार पडला
















