*जेष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांचा ८५ वा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना शालेयउपयोगी साहित्याचे वाटप करून साजरा….!*
प्रतिनिधी : *श्री श्री ज्ञानमंदिर दहिगाव या ठिकाणी शाळेच्या पहिल्या दिवसाचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप माळशिरस तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास कमिटी यांच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमात एक हात मदतीचा व दर्शन घडवू माणुसकीचे या उद्देशाने केक,हार,तुरे,शाल,फेटा व,बॅनर यांचा अनावश्यक खर्च टाळून शालेय उपयोगी साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले हा उपक्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष मा.भिमराव फुले यांनी स्विकारले तसेच हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तालुकाध्यक्ष पांडुरंग फुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष दत्ता भोसले, सामाजिक कार्यकर्ते शिवराम गायकवाड, अकलूज शहराध्यक्ष बाबासाहेब कारंडे,ज्येष्ठ नेते रामहरी गोडसे,माजी दहिगाव सरपंच अंकुश बनकर,अजित पवार सदाशिवनगर शहराध्यक्ष,महादेव सावंत,आयुब मुलाणी तसेच श्री श्री ज्ञानमंदिर प्रशालेच्यावतीने मुख्याध्यापिका सौ.बनकर मॅडम यांच्यासमवेत इतर शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते शिवराम गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रशालेचे शिक्षकसेवक मा.बनकर सर यांनी केले तर अनेक मान्यवर व विद्यार्थी,मोठ्या संख्येने पालक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.*









