माळशिरस तालुक्यातील विज कामासाठी निधी द्या : आ मोहिते पाटील
अकलूज / प्रतिनिधी – माळशिरस तालुक्यातील विद्युत विभागांचे कामांना जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ मध्ये निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे . सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली . या बैठकीत आ मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यासह जिल्ह्यातील मागण्यांचे निवेदन पालकमंत्री भरणे यांना दिले . आ मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील विद्युत विभागाचे कामांना जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ योजनेअंतर्गत निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली . यामध्ये मौजे निमगांव (म) येथील लिक लाईन लोड वेगळा करणेसाठी ११ के.व्ही. शेरी फिडर व निमगांव एजी फिडर ३३/११ केव्ही निमगांव उपकेंद्र करणे , मौजे श्रीपूर येथील काळेवस्ती गावठाण डीपी येथे अँडीशनल करणे , मोजे दहिगांव (किरदकवस्ती) येथे नाना शंकर किरदकर यांचे घरगुती कनेक्शन देणे , मौजे मारकडवाडी येथील शहाजी सदाशिव मारकड व शंकर आप्पा मारकड यांनाघरगुती कनेक्शन देणे , मौजे मारकडवाडी येथील हरिभाऊ महादेव मारकड, चंद्रबाई दादा मारकड, सुनंदा हनुमत मारकड, अंकुश महादेव मारकड यांना घरगुती कनेक्शन देणे , मौजे माळशिरस (टेळेवस्ती) येथील विष्णू गोविंद टेळे यांना घरगुती कनेक्शन देणे , मौजे खंडाळी गावठाण येथे अँडीशनल डीपी बसविणे , मौजे दत्तनगर येथे अँडीशनल डीपी बसविणे , मौजे डोंबाळवाडी येथे अँडीशनल डीपी बसविणे , मोरोची येथील पानसकरवस्ती येथे अँडीशनल डीपी बसविणे , मौजे धर्मपुरी येथे अँडीशनल डीपी बसविणे , मौजे कोळेगांव येथे ११ केव्ही लिंक लाईन ११ केव्ही कोळेगांव फिडरला ३३/११ केव्ही कोळेगांव उपकेंद्र करणे , मौजे कुसमोड गारवाड येथे ११ केव्ही लिंक लाईन लोड वेगळा करणेसाठी कुसमोड एजी फिडर ओव्हर लोडेड २४५ Amp करणे , खुडूस/भाकरेवाडी येथे ११ केव्ही लिंक लाईन लोड वेगळा करणेसाठी , मौजे बाभुळगांव येथे लालासाहेब पराडे गावठाण येथे अँडीशनल सिंगल फेज डीपी करणे , मौजे गोरडवाडी गावठाण येथे अँडीशनल डीपी करणे , मौजे गिरवी येथे १ एजी कनेक्शन गोपाळ सखाराम शिंदे गट नं. ३४१/१ देणे , मौजे फोंडशिरस येथे १ घरगुती कनेक्शन धनंजय गोविंद नवडकर G.n. २९०५ देणे , मौजे फोंडशिरस येथील ठोंबरे डीपीला अॅडिशनल डीपी करणे , मौजे इस्लामपूर येथील सुहास शांताराम रणवरे गट नं. ३५९ घरगुती कनेक्शन देणे , मौजे इस्लामपूर येथे पिराळे गावठाण अँडिशनल डीपी करणे , मौजे पिराळे येथे लघुदाब वाहिनीवर श्रीमंत रामचंद्र बुदनवले यांना घरगुती कनेक्शन देणे , मौजे फोंडशिरस येथे ९ घरगुती कनेक्शनसाठी लघुदाब वाहिनी करणे , मौजे नातेपुते येथे १ शेतीपंप कनेक्शन किशोर भारत लोनारी यांना देणे , मौजे पिंपरी येथे सरपंच नं. १ डीपी अॅडिशनल डीपी करणे , मौजे मांडवे येथे १ शेती पंप कनेक्शन व अँडीशनल डीपी करणे, मौजे जळभावी येथे नाथा तुकाराम शेंबडे घरगुती कनेक्शन करणे , मौजे पुरंदावडे येथे क्षमता वाढ डीपी Aug ६३ केव्हीए ते १०० केव्हीए पुरंदावडे गावठाण (४८०८५८) मौजे मेडद येथे मेडद गावठाण अँडीशनल डीपी करणे , मौजे संग्रामनगर येथील पद्मावतीनगर येथे एलटी लाईनचे एबी केबल मध्ये बदलणे १०० केव्हीए पद्मावती डीपी करणे , मौजे बागेचीवाडी येथील पाटीलवस्ती एलटी लाईनचे एबी केबल मध्ये बदलणे १०० केव्हीए पाटीलवस्ती डीपी देणे , मौजे कदमवस्ती येथील एलटी लाईनचे एबी केबल मध्ये बदलणे १०० केव्हीए कदमवस्ती डीपी देणे , मौजे झंजेवस्ती येथील डीपी ला रेळेकर डीपी अँडीशनल करणे , मौजे कुसमोड येथील डीपी ला वाघ डीपी अँडीशनल करणे,मौजे कोंडबावी येथील एलटी लाईनचे एबी केबल मध्ये बदलणे १०० केव्हीए कोंडबावी डीपी, मौजे अकलूज येथील डीपी ला अँडीशनल इंदिरा घरकुल डीपी करणे , मौजे चाकोरे (प्रतापनगर) येथील डीपी ला अँडीशनल देशमुख डीपी करणे ,मौजे शिंगोर्णी येथील डीपी ला अँडीशनल पाणी पुरवठा (कोळेकर) डीपी करणे. मौजे बचेरी येथील डीपी ला अँडीशनल गाव डीपी करणे. (४७१६६०२) मौजे बचेरी येथील डीपी ला अँडीशनल पाठक डीपी करणे (४७१६७५६) , मौजे फळवणी डीपी ला अँडीशनल सुरवसे डीपी करणे. (४७१६७४५) , मौजे अकलूज येथे क्षमतावाढ डीपी Aug ६३ केव्हीए ते १०० केव्हीए समतानगर डीपी , मौजे अकलूज येथे अँडीशनल डीपी बाजार तळ (फिश मार्केट डीपी) DTC , मौजे पिरळे येथे २ घरगुती कनेक्शन सोमनाथ गुलाब शिंदे व उत्तम गुलाब शिंदे करणे , मौजे अकलूज येथे क्षमतावाढ डीपी Aug ६३ केव्हीए ते १०० केव्हीए अवाड डीपी , मौजे विजयवाडी येथील एलटी लाईनचे एबी केबलमध्ये बदलणे १०० केव्हीए विजयवाडी डीपी , मौजे गारवाड येथील ५ शेतीपंप कनेक्शन व अँडीशनल डीपी श्री. तानाजी सर्जेराव शिंदे व इतर ४ कनेक्शन , मौजे बागेचीवाडी येथील एलटी लाईनचे एबी केबलमध्ये बदलणे १०० केव्हीए गुरुमाऊली डीपी , मौजे गारवाड येथे अँडीशनल डीपी मोहिते पाटील नं. १ डीपी (७१६१७१६) , मौजे विजयवाडी (वैदवस्ती) एलटी लाईनचे एबी केबलमध्ये बदलणे १०० केव्हीए वैदवस्ती डीपी आदी बाबत पत्र दिले आहे .







