डेप्युटी सिईओ चंचल पाटील यांना निलंबित करा -आ. राम सातपुते
सोलापूर,दि. १३ (प्रतिनिधी)जिल्हा परिषद प्रभारी समाज कल्याणधिकारी चंचल पाटील यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबीत करा अशी मागणी माळशिरस चे आमदार रामभाऊ सातपुते यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे. सोमवारी जिल्हा नियोजनाची सभा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सभे दरम्यान आ.सातपूते यांनी गौणखनिजाचे उत्खनन करुन मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग प्रमुख चंचल पाटील यांच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचला. दलितवस्ती विकास निधी देण्यासाठी ५% लाच म्हणून घेतात हे मलाचं काय जिल्ह्यातील प्रत्येक आमदार,जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्यांना माहीत. आहे. चंचल पाटील यांचा चार्ज काढण्याचे आश्वासन पालकमंत्री भरणे यांनी दिले आहे. मात्र ते शब्द पाळतील का ? हे मला माहीत नाही.. चंचल पाटील आणि त्यांचे लिपीक नरळे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा मी आमदारकीचा राजीनामा देईन. असा इशाराचं थेट आमदार राम सातपुते यांनी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. समाज कल्याण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे सातत्याने केली आहे. मात्र त्यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे आमदार राम सातपुते यांनी सांगितले.*अन्यथा राजीनामा देणार : आ.राम सातपुते.* दरम्यान आ.सातपुतेंच्या या गंभीर आरोपांनंतर झेडपीचे प्रमुख असलेल्या सिईओ दिलीप स्वामींना अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी भेटण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची भेट झाली नाही. दरम्यान वा प्रकरणी पत्रकारांनी स्वामी यांना फोन केला असता, त्यांनी पीआरसी कमेटी दौऱ्याचे कामकाज चालू आसल्याचे सांगून भेट नाकारली तसेच चंचल पाटील यांची देखील भेट पत्रकारांची होऊ शकली नाही. था जिल्हा नियोजसमिती बैठकीला पालकमंत्री दतात्रय भरणे, जिल्हाधिकारी मितींद शंभरकर, सीईओ दिलीप स्वामी, आ. राजेंद्र राऊत, आ.बबनदादा शिंदे,आ. संजयमामा शिंदे, आ.समाधान आवताडे,दिपक साळूंखे पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.







