*कृष्णानंद विद्यालयात (पाटील वस्ती) शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा शुभारंभ,स्वागत व प्रवेशोत्सव साजरा*
संग्रामनगर दि.१५ (केदार लोहकरे याजकडून)शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती (ता.माळशिरस) या शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सर्जेराव राजाराम कदम व बाळासाहेब यादव होते मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी विद्यालयांमध्ये उपस्थित होते. प्रशालेच्या प्रवेशद्वारावर सर्व विद्यार्थ्यांचे बँडच्या तालावर गुलाब पुष्प व फुगे देऊन स्वागत करण्यात आले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी व क्रमिक पुस्तके वाटण्यात आली. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी रांगोळी,आंब्याच्या पानांची तोरणे लावून आपल्या वर्गाची सजावट केली होती.सर्व विद्यार्थ्यांना शाळेची नियमावली व भौतिक सुविधांची माहिती देण्यात आली व आनंददायी शिक्षणाची सुरुवात पहिल्या दिवसापासून करण्यात आली.स्वागत व प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक धर्मराज दगडे,महेश शेटे, सुनील भोसले,विजय वाघमारे,साहेजाफर सय्यद,दिलीप एकतपुरे,दादा ढोले,सुवर्णा गायकवाड,कल्पना मोरे,विजया पेटकर,पुष्पा चेमटे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी केले तर संतोष अनगळ यांनी आभार मानले.







