*छत्रपती शाहू महाराजांच्या न्यायनगरीत न्यायदानाचे काम करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्यच* *प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती वृषाली जोशी मॅडम*
कोल्हापूर दि.१३ (केदार लोहकरे याजकडून)कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने नवीन पदभार स्वीकारलेल्या न्यायाधीशांचा सत्कार तसेच व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वैशाली जोशी मॅडम यांची मुंबई येथे बदली झाल्याने निरोप समारंभ कार्यक्रम कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला. कोल्हापूर जिल्हा न्यायालयात पदभार स्वीकारलेल्या माननीय न्यायाधीशसो श्रीमती पी.एफ.सय्यद,श्री.एस.एम.तांबे,एच.ए.मुल्ला,श्री.एस.एस.जगताप,श्री.जे. एम.पांचाळ,श्री.के.आर.सिंघेल,श्री. एम.जी.मस्के,श्री.एम.एम.पळसापुरे श्री.एस.एस.तट,श्रीमती एस.डी.कांबळे,श्रीमती एल.पी.जाधव यांचा ज्येष्ठ विधिज्ञ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख जिल्हा न्यायाधीशसो श्रीमती वृषाली जोशी मॅडम यांचे निरोप समारंभ,प्रसंगी बोलताना जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके यांनी असे प्रतिपादन केले की करवीरनगरी ही न्यायभूमी आहे.कोल्हापूरमध्ये न्यायदान करण्यास मिळणे हे मोठे भाग्य आहे बार बेंच मध्ये समन्वय असल्यास चांगले न्यायदान होते कोल्हापूर जिल्ह्यातील वकील हे सक्षम वकील म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात याचा फायदा नवीन आलेल्या न्यायधीशाना होत असतो. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सदस्य अॅड.विवेक घाटगे यांनी प्रतिपादन केले की बार आणि बेंच मध्ये सौदर्याचे भावना पाहिजे.खंडपीठ आंदोलनात 58 दिवस संप वेळी न्यायधिशानी जे सहकार्य केले ते उल्लेखनीय आहे.यावेळी जेष्ठ वकील के.ए.कापसे यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश वृषाली जोशी मॅडम यांचे कामाचे कौतुक केले.न्यायदान करताना न्यायाधीश जुनियर सिनियर असा भेदभाव ठेवत नाहीत.यावेळी बार असो चे माजी अध्यक्ष अॅड.प्रकाश मोरे,अॅड.संपतराव पवार,यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. सदर निरोप समारंभ प्रसंगी बोलताना श्रीमती वृषाली जोशी मॅडम यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की,कोल्हापूर शाहू न्यायनगरीत न्यायदानाचे काम करणेस मिळणे हे आमचे भाग्य समजतो,कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा सर्व इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा व्यक्त केली.सदर कार्यक्रमास बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवा चे माजी अध्यक्ष अॅड.महादेवराव अडगुळे,अॅड शिवाजीराव राणे,अॅड.अशोक पाटील,अॅड.दीपक पाटील,बार असोसिएशनचे सहसचिव संदीप चौगले,अॅड.तृप्ती नलवडे,अॅड.संकेत सावर्डेकर,अॅड सुशांत चेंडके,अॅड.करण पाटील तसेच जेष्ठ वकील सभासद उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत सचिव अॅड.विजयकुमार ताटे देशमुख यांनी केली तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी केले.







