अकलूज भाजपा च्या वतीने विजयदादां च्या वाढदिवसानिमित्त गरजू व्यक्तींना घरावरील पत्रे वाटप.
अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाचे अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे यांच्या वतीने वार्ड क्र 5 मधील दोन गरजू कुटुंबांना घरावरील पत्रे वाटप करण्यात आले .या वेळी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते ,भाजपचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील ,सचिन शिंदे, भाजपचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुक्तार कोरबु,भाजपचे अकलूज शहर चिटणीस शेखर माने,माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश वसेकर उपस्थित होते. या वेळी भाजपचे सर्व सदस्य . भैय्या चंदनशिवे, राहुल गायकवाड, संजय खंडागळे, लखन गायकवाड, सुहास गायकवाड, तेजस इंगळे, अवि खंडागळे, प्रवीण खंडागळे, यश शिंदे,सोन्या शिंदे आदी उपस्थित होते.










