धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज परिसर यांचे वतीने विजयदादांचा वाढदिवस वह्या भेट देऊन साजरा.
अकलूज (प्रतिनिधी )धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज परिसर यांचे वतीने महाराष्ट राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन दादांना शुभेच्छा दिल्या व पाच डझन वह्या वाढदिवसाची भेट म्हणून देण्यात आल्या.याप्रसंगी अध्यक्ष लक्ष्मीकांत वाघे,सचिव संजय पाडोळे,दिलीप होनमाने, रणजीत सुसलादे,सुधाकर पोटे,शिवाजी घोडके, गणेश लंबाते,रुपेश पोटे,नागेश शिंदे,तात्या पोटे, सागर देवकाते,महेश वगरे,राजगे सचिन सरगर,योगेश बबलादी,गणेश सावळजकर,गजानन गाडेआदी मान्यवर उपस्थित होते.







