आमदार रामभाऊ सातपुते ठरतायत गोरगरीब रुग्णांचे तारणहार.अवघ्या दोन वर्षाच्या रुद्र च्या हृदयाच्या छिद्र चे ऑपरेशन यशस्वी.
अकलूज (प्रतिनिधी )*”माझ्या दोन वर्षांच्या मुलाच्या हृदयात छिद्र आहे आमदारसाहेब , त्याचं ऑपरेशन करावं लागणार , आम्हाला मदत करा साहेब “* हे ऐकून उपस्थित सर्वांच्या काळजात चर्र झाले .नेहमीप्रमाणे माळशिरस मध्ये जनता दरबार सुरु होता , त्यावेळी आपल्या दोन वर्षांच्या ‘रुद्र’ चे वडील शेतकरी कुंडलिक येळे यांनी आमदार राम सातपुते यांच्याकडे त्यांची व्यथा मांडली . छोट्या रुद्रसाठी आमदार राम सातपुते यांनी प्रयत्न चालू केले . मुंबई मधील प्रसिद्ध धीरूभाई अंबानी रुग्णालयात वैयक्तिक लक्ष देऊन ,भेटून पुढील सर्व गोष्टी मार्गी लावल्या .या ऑपरेशन साठी रुद्र ला तब्ब्ल एक महिना हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावे लागले .साधारणतः 11 लाख रुपये असा ऑपरेशन चा खर्च झाला . आमदार राम सातपुते . त्यांच्या आरोग्य सेवकांच्या टीमने हे ऑपरेशन मोफत करण्यासाठी प्रयत्न केले .ते यशस्वी झाले .हे ऑपरेशन होईपर्यँत सर्वांना एक हुरहूर लागली होती . काही दिवसांपूर्वी हे ऑपरेशन झाले व रुद्र ची प्रकृती आता चांगली आहे .सर्वांना खूप आनंद झाला आहे .*अशा सामान्यांच्या कामांची पूर्ती झाल्याचे समाधान हीच आमदार रामभाऊ सातपुते यांची पुंजी आहे.**आमदार रामभाऊ सातपुते.*








