बहुजन सत्यशोधक संघाचे वतीने मोडनिंब तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते रविवार दिनांक 5 / 6 / 2022रोजी बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओव्हाळ यांचे वाढदिवसा निमित्ताने भरवलेल्या या मेळाव्यात शेकडो केडर बेस कार्यकर्ते अनेक जिल्ह्यातून उपस्थित होते , या शिवाय सर्व पक्षीय कार्यकर्ते व नेते गण ही उपस्थित होते या सभेस संबोधित करताना वक्ता या नात्याने मी विचार मांडले की फुले , शाहू , आंबेडकर वादी विचारधारा व पेरियार स्वामी चे विचारधारा नुसार बहुजन समाज मार्गक्रमण करेल तेंव्हा सत्ता बहुजनांच्या पायाशी लोळण घेईल , ही बाब मा कांशीराम जी साहेबांनी सिद्ध करून दाखवले ली आहे दुर्दैवाने या मार्गापासून चळवळी व पक्ष भरकटल्यानेच आज उत्तर प्रदेश सारख्या राज्यात ही बहुजनांचा भ्रम निरास झालेला आहे चीन मध्ये एक म्हण आहे “झाडे नेहमी शेंड्या कडून वाळतात” आंबेडकरी चळवळीच्या पक्ष प्रमुखांनी जातीयवादी , धर्मवादी पक्षा समवेत जाऊन गंभीर अशी चूक केली आहे , आज सत्तेत असलेल्या पक्षांमुळे दलीत व अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना वाढीस लागलेली आहे , या वर्गाला झुंड शाहिने चिरडण्यात येत आहे , ही बाब दादरी येथील अखलाक यांच्या हत्येवरून सिद्ध होते आज भारतीय राज्य घटना मोडली जात आहे , न्यायालय , प्रशासन व शासकीय संस्था केंद्राच्या हातातील बाहुले तर प्रसार माध्यमे सरकारचे भाट बनलेली आहेत व ही बाब लोकशाही साठी अत्यंत घातक आहे , या कार्यक्रमासाठी रिपाई खोब्रागडे गटाच्या पच्छिम महाराष्ट्र अध्यक्षा माया खरे (सौ माया हनुमंत आढाव)उपस्थित होत्या







