अकलूज येथील रिक्षा चालक बाळू साठे यांनी रिक्षात राहिलेले पाच ताेळे साेन्याचे दागिने परत दिल्याबद्दल अकलूज पोलिसांनी केला सन्मान.
अकलूज (प्रतिनिधी )
आजच्या काळातील वाढती महागाई .आणि कोरोना नंतरची बदलती परीस्थिती या दाेन्ही गोष्टीचा विचार करता सध्या माणूसकी आणि ईमानदारी लोप पावत चालली आहे की काय ? असं वाटत असतानाच मूळचा वेळापूर येथील व सध्या अकलूज (संग्राम नगर )येथील रत्नपुरी येथे आपल्या कुटुंबासहीत राहत असलेल्या व रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या (एम. एच.45-3621)या रिक्षाचे चालक बाळू शंकर साठे यांनी आपल्या रिक्षात विसरलेल्या पर्स मधील सुमारे पाच तोळ्याचे दागिने परत देऊन आजही प्रामाणिकपणा जिवंत आहे याची प्रचिती दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकलूज येथील माळशिरस पंचायत समिती च्या माजी सदस्या सौ. उमाताई अतुल शेटे या लग्न कार्यानिमित्त 1जून रोजी आपल्या अकलूज येथील विजय चौकात असलेल्या घरापासून रिक्षाने गांधी चौक येथे चालल्या होत्या. त्यानंतर गांधी चौकात पाऊस सुरु झाल्यानंतर त्यांनी आपली पर्स भिजू नये म्हणून रिक्षात ठेवली. थोड्या वेळाने लोणंद येथे लग्न समारंभा साठी जाण्याकरिता एस. टी आल्यानंतर त्या तशाच निघून गेल्या. परंतु थोडे अंतर पुढे गेल्यानंतर एस. टी चे तिकीट काढण्यासाठी त्यांनी आपली पर्स पाहिली असता, त्यांना ती रिक्षात राहिली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या परत गांधी चौक येथे आल्या असता. रिक्षात बसलेल्या बाळू साठे यांनी त्यांना बोलावून ती पर्स परत दिली. ती पर्स उघडून पाहिली असता. त्या पर्स मध्ये पाच तोळे सोन्याचे दागिने जसेच्या तसे होते. त्यानंतर त्यांनी बाळू साठे यांना काही बक्षीस देऊ केले असता, ते त्यांनी नम्रतेने नाकारले.
दरम्यान 4मे रोजी अकलूज पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि ग्राम सुरक्षा चे समन्व्यक पोलीस मित्र परिवार चे संस्थापक पोलीस हवालदार रमेश सुरवसे -पाटील यांना हे समजल्या नंतर त्यांनी बाळू साठे यांना अकलूज पोलीस स्टेशन ला बोलावून अतुल शिवलिंग शेटे यांच्या वतीने हार घालून फेटा व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी बाळू साठे यांना बक्षीस देऊ केले असता. त्यांनी ते विनम्र पणे न
याप्रसंगी अकलूज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर,समन्वयक ग्रामसूरक्षा व पाेलीस मित्र चे संस्थापक पाेलीस हवालदार रमेश सूरवसे पाटील,सुहास क्षीरसागर, मदभावे,सामाजिक कार्यकर्ते अतुल शेटे,पत्रकार गणेश जाधव,पोलीस मित्र विनाेद काळे, डीबी स्टाफ,इतर पाेलीस स्टाफ, विष्णू आंधळकर, समाधान आवारे, लाला गाडे, रघु गाडे, गणेश मोटे, गोरख थोरात, अजित साठे, चेतन साठे, प्रमोद चव्हाण, रामभाऊ चव्हाण इत्यादी उपस्थित होते.















