सातारा येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कक्ष अधिकारी नामदेव साबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सातारा (प्रतिनिधी )जिल्हा उपनिबंधक सातारा कार्यालयात कक्ष अधिकारी या पदावर कार्यरत असलेले आमचे मित्र बंधू मा. श्री.नामदेव साबळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गेली कित्येक वर्षे सहकारात कार्य करताना त्यांनी नेहमी मोलाचे सहकार्य केले व करत आले आहेत. त्यांच्यात असलेला कामातील एकाग्रपणा, प्रामाणिकपणा, कामाबद्दल असलेली आत्मीयता, एकनिष्ठता, सहनशीलता, शिस्थबद्धता, स्वाभिमानीपणा, कर्तव्यदक्षता, संयमपणा,शांत आणि लाघवी बोलण यामुळे त्यांनी सर्वांची मन जिंकून घेतली आहेत हया सर्व गोष्टी स्वतः आत्मसात करत असताना इतर ही बऱ्याच जणांना त्यांनी त्या शिकवल्या आहेत. त्यांनी स्वतः अंगीकृत आणि आत्मसात केलेल्या वरील गोष्टीमुळेच ते प्रत्येकाला हवेसे आणि आपल्या जवळचे वाटतात. सर्वांशी ते मैत्रीपुर्ण भावननेने वागणे व बोलणे असते. त्यांचा जन्म सातारा तालुक्यातीत वेळेकामथी गावातील आगुंडेवाडी या छोटयाश्या गावामध्ये ०१/०६/६९ रोजी झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण वेळे गावामध्ये झाले. तसेच माध्यमिक शिक्षणासाठी ते मामाच्या गावी चिंचणी येथे वाघेश्वर हायस्कूल येथे झाले. तिथेही त्यांनी आपला मित्रपरिवार जोडला. त्यांनंतर छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांना पोलीस दलामध्ये काम करून देशसेवा करण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. मात्र त्याचवेळी त्यांना सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यांची पहिली पोस्टींग १९९२ मध्ये सहाय्य्क निबंधक कार्यालय,महाबळेश्वर येथे झाली. साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा तसेच त्यांचे भावी आयुष्य सुखसमृध्दी भरभराटीचे व चांगले आरोग्यदायी जावो ही सद्गुरू चरणी प्रार्थना🌹













