*अकलूजच्या फार्मसी कॉलेज महाविद्यालयाची आयुर्वेदिक रसशाळेला भेट.
*संग्रामनगर दि.1 (केदार लोहकरे याजकडून)माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी अकलूजच्या विद्यार्थ्यांनी विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाळा कटफळ एम.आय.डी.सी.बारामती या ठिकाणी अभ्यासपूर्ण भेट दिली. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक रसशाळेतील विविध प्रकारच्या औषधी उत्पादन विभागमध्ये जाऊन त्यासंबंधीची सखोल माहिती घेतली यावेळी कंपनीतील व्यवस्थापक सारंग बापट व श्रीकांत सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रक्रियांची माहिती दिली.नंतर आयुर्वेदिक रस शाळेचे प्रमुख डॉ.खाडे सर यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला,विविध आजारांची कारणे त्यावरील उपचारासाठी उपयोगात येणारी आयुर्वेदिक औषधांची माहिती तसेच रस शाळेत तयार होणारी आयुर्वेदिक ग्रंथातील माहितीचा आधार असणारी ग्रंथीय उत्पादने व प्रोप्रायटरी उत्पादने यांचे उत्पादन माहिती सोप्या पद्धतीने सांगितली.सदर संवादांमधून मानवी जीवनात सध्याच्या व भविष्यात होणाऱ्या आजारांचे निराकरण करण्यासाठी आयुर्वेदिक औषध उत्पादनांचे महत्त्व खूप मार्मिक शब्दात वर्णन केले. या भेटीस ४२ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाचे प्रा.डॉ.मुकुंद गाडे,प्रा.स्वप्निल राजे घाडगे,प्रा.बापूराव अंकलगी,प्रा.प्रशाली शिंदे,प्रा.स्नेहल काशीद व समाधान दुरापे उपस्थित होते. विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाळा सोबत महाविद्यालयाचा सामंजस्य करार आहे,महाविद्यालय व आयुर्वेदिक रसशाळा यांनी भविष्यात एकत्रितपणे विविध उपक्रमांबद्दल काम करण्याचा संकल्प केला,अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंग व संशोधनातील अभ्यासासाठी च्या विविध सुविधा उपलब्ध होतील.














