धन्य धन्य अहिल्याबाई ।गेली कीर्ती करुनिया,भूमंडळाचे ठायी।।महाराज अहिल्याबाई ,पुण्यप्राणी ।संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्न खाणी ।। संसार चालली दीनदुबळ्यांची आई ।जेविल्या सर्व,मगच आपण अन्न खाई ।। बांधिले घाट- मठ- पार । कुठे वनात पाणी गार ।।राजमाता अहिल्याआईस जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम….
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज येथे उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष शिवमती मिनाक्षी अमोल जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, माळशिरस तालुका सचिव शिवमती पुनम रणजित सुसलादे, अकलूज शहर संघटक शिवमती वैष्णवी गणेश साळवे, शीवमती वनिता शिंदे, शिवमती जागृती देशमुख मचाले,शिवमती हेमा बाळासाहेब मुळीक, शिवमती वनिता कोरटकर, शिवमती लक्ष्मी दत्तात्रय घंटे, शिवमती अनिता राजेंद्र दळवी, शिवमती वनिता दत्ता शिंदे, शिवमती शुभांगी अर्जुन कोरटकर, शिवमती सोनाली अमोल कांबळे, शिवमती उज्वला अडाणै,शिवमती रेशमा विनायक गायकवाड, शिवमती सुरेखा पंढरीनाथ कचरे तसेच जिजाऊ ब्रिगेड सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.















