*जागतिक पॅराअॅथलेटिक्स स्पर्धेत दत्ता वरकड याने सिल्वहर पदक मिळविल्याबद्दल धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार.
*संग्रामनगर दि.३१ (केदार लोहकरे याजकडून)इटली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक पॅराअॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये चाकोरे (ता.माळशिरस) गावचे सुपुत्र व शंकरराव मोहिते महाविद्यालयाचा माजी धावपटू दत्ता वरकड याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सिल्वहर पदक मिळविल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्याचा फेटा शाल श्रीफळ व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती भेट देवून सत्कार करण्यात आला. दत्ता वरकड याने पॅराअॅथलेटिक्स ग्रॅण्ड प्रिक्स इटालियन ओपन २०२२ स्पर्धेमध्ये १०० मीटर धावणे व लांब उडी या खेळामध्ये सहभाग घेतला होता.त्यामध्ये १०० मीटर धावण्याचे स्पर्धेत सिल्वहर पदक मिळविले आहे. या पुढे ही असाच कठोर सराव चालू ठेऊन पुढील होणाऱ्या ऑलिंपिक व एशियन गेम १०० मिटर रनिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळावे म्हणून शुभेच्छा देवून व अभिनंदन केले व धैर्यशील मोहिते पाटील यांनी वरकड याला पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ही दिल्या. वरकड याला प्रशिक्षक सूर्याजी लिगड,शेखर कुदळे व प्रा.अरविंद वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले.












