दैनिक जनमत चे संपादक महादेव (आप्पा )नरोटे यांची अकलूज येथे सदिच्छा भेट.
अकलूज (प्रतिनिधी )सहा जिल्ह्यात वितरित होणाऱ्या व अल्प अवधीतच लोकप्रिय ठरलेल्या दैनिक जनमत सोलापूरचे संपादक महादेव( आप्पा) नरोटे यांनी अकलूज व शंकरनगर येथे धावती भेट दिली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी अॅन्ड रिसर्च शंकरनगर अकलूज येथे प्राचार्य इंद्रजीत यादव यांनी शाल व अकलाई देवीची प्रतिमा देवून सन्मान केला. तसेच शिवरत्न शिक्षण संस्थेला भेट दिली असता. समाधान वाघमारे यांनी स्वागत करून संस्थेची सविस्तर माहिती दिली.तसेच अकलूज येथील शासकीय विश्राम गृह येथे दैनिक जनमत चे अकलूज प्रतिनिधी गणेश जाधव व संजय लोहकरे (संग्रामनगर) यांनी फेटा,श्रीफळ व हार घालून यथोचित सन्मान करण्यात आला.









