अकलूज येथे होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषकाचे आयोजन….
सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना आयोजित होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमन क्रिकेट चषक (भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट) स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. 28.05 2022 रोजी सकाळी साडेनऊ वाजता सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे डॉ. अजय तायडे (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र राज्य) हे भूषविणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. एम. के.इनामदार,डॉ.रामचंद्र मोहिते (तालुका वैद्यकीय अधिकारी माळशिरस तालुका), डॉ. राजीव राणे, डॉ.नितीन एकतपुरे, डॉ.एस.एन. कुलकर्णी, डॉ.टी.आर. कदम, डॉ.सुनेत्रा दोशी ( ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉक्टर माळशिरस तालुका), डॉ.धनेश गांधी,डॉ. प्रविण पाटील (अध्यक्ष निमा, माळशिरस तालुका), डॉ. ज्ञानेश्वर पवार (उपाध्यक्ष पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना) यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. जिल्हा व आसपासच्या तालुक्यातून दहा बारा संघांनी भाग घेतला असून महिलांच्या संघांनी सुद्धा सहभाग नोंदवला असून दोन दिवस चालणाऱ्या या क्रिकेट सामन्याचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. 29 मे 2022 रोजी होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास परिसरातील सर्व नागरिकांनी व डॉक्टर्स मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे संस्थापक डॉ.सुनिल वरळे, अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड, सचिव डॉ. संजय देशमुख, उपाध्यक्ष डॉ. कालिदास लिमकर ,सदस्य डॉ. शिवाजीराव काळे, डॉ. विठ्ठल कवितके, डॉ.सौ. संगीता पाटील, डॉ.रमेश सिद, डॉ.अविनाश घोलप, डॉ.सुजित भिसे, डॉ.रमेश जकापुरे, डॉ.नरेंद्र मदने, डॉ.शहाजी डोंगरे, डॉ.सौ.मीनल शहा, डॉ.शितल फडे तसेच क्रिडा समितीचे डॉ. अनिल बळते,डॉ. नागनाथ दगडे, डॉ. हर्षवर्धन गायकवाड, डॉ. नितीन कुबेर, डॉ. अक्षय वाईकर, डॉ.मिलिंद हिंगमिरे, डॉ. सौ.सपना गांधी,डॉ. फैजल शेख यांनी केले आहे..














