जुन्या भांडणाचा राग ठेवून अकलूज येथील तरुणावर खुनी हल्ला.
अकलूज (प्रतिनिधी )जुन्या भांडणातील केस माघारी घे. अन्यथा मी तुला खलास करतो. असे म्हणत अकलूज येथील तरुणावर कुऱ्हाडी ने वार करणाऱ्या हिरा खंडागळे आणि इतर व्यक्तीवर निखिल नागनाथ सिरसट याने दिलेल्या फिर्यादीवरून पाेलीस ठाणे अकलूज येथे गू.र.न ३५७ /२०२२ अन्वये भा.द.वि ३०७ व १२० ब व सहकलम १४३ ते १४७ ते १४९ प्रमाणे५०४,५०६ गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निखील नागनाथ सिरसट (वय २६) धंदा -मजूरी रा – व्यकंटनगर अकलूज ता माळशिरस याने दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी हिरा खंडागळे व ईतर सात रा अकलूज व परीसर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात हकीकत अशी की, यातील फिर्यादी व आरोपी हे दाेन्ही अकलूज येथील रहिवाशी असून फिर्यादी व आरोपी यांचेत जून्या भांडणाचा वाद हाेता. ती केस काढून घेणेचे कारणावरून दिनांक १७/५/२०२२ राेजी रात्री १०।३० वाजणेचे सूमारास यातील फिर्यादी हा त्याच्या मित्राचे भांडण साेडवण्यासाठी अकलूज पाेलीस स्टेशनला आला हाेता. त्याचवेळी यातील अराेपी हा त्यांचे पाळतीवर सूमारे दाेन तासापासून वाट पहात हाेता व फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने हातात कू-हाड घेवून येवून फिर्यादीच्या पाठीमागून येवून तू लई मस्तीला आलाय का? माझा नाद करू नकाे मी केस मागे घेत नाही असे म्हणत तूला खलास करताे असे म्हणत डाेक्यावर वार केला.ताे पाठीमागे मानेवर बसला आणि रक्त आले त्यावेळी फिर्यादीने घाबरून अेारडल्यामूळे दूसरा वार करणेसाठी पाठीमागे अराेपी पळत आलेने तेथील फिर्यादीचे सहकारी व पाेलीस यांच्या मदतीने अराेपीस कू-हाडीसह जेरबंद केले आहे.यावेळी फिर्यादीस मार लागल्याने तात्काळ राणे हाँस्पीटल येथे दाखल करण्यात आले आहे.आणि गून्हातील अराेपी हत्यारासह जेरबंद करून जख्मी फिर्यादीच्या जबाबावरून गून्हातील संशयीत ईतर अराेपी व खूनाचा कट रचणारे अराेपी यांचा तपास पाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पाेस़ई जगताप करीत आहेत.







