
संग्राम नगर दि.१० (केदार लोहकरे याजकडून)सध्या सगळीकडेच उन्हाचा पारा वाढल्यामुळे दुपारी माणसांबरोबर पशु पक्षी व प्राण्यांची लाहीलही होवू लागली आहे.तर काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्यासाठी पक्षांवर तहान भागविण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. काल माळशिरस तालुक्याचे तपमान ४४ च्या वर गेल्यामुळे माणसांचा जीव कासाविस होत होता. त्याच बरोबर प्राणी व पक्षांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.काल शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या समोरील बागेमध्ये हिरवळीवर भर उन्हात एक चिमणीचे पाण्या वाचून तडफडताना महाविद्यालयातील शिपाई बाबा कदम व तात्या गोरे यांना दिसले क्षणाचा ही विलंब न लावता त्यांनी कागदी कपात पाणी आणून चिमणीला पाणी पाजले व नंतर थोडे राहिलेले पाणी त्या चिमणीच्या पंखावर व अंगावर शिंपडले.पोटभर पाणी पिल्यानंतर तीचा जीव शांत झाला व चिमणीने थोड्या वेळाच्या विश्रांती नंतर शरीरातील थकावट दुर झाल्याने या चिमणीने परत हवेत भरारी घेवून निघून गेली. पाण्यासाठी आज पक्षी व प्राण्यांवर ही वेळ आली आहे.पुढे जर असाच काळ राहिला तर पक्षांबरोबर माणसांना ही पाण्यासाठी भटकंती करायला वेळ लागणार नाही यात शंकाच नाही.लोकांमध्ये आताच झाडे लावायचे व पाणी बचतीची जन जागृती करणे गरजेचे आहे.









