*एमएमसी नोंदणीचा मार्ग मोकळा; १८ ऑगस्टचे पत्र शासनाकडून रद्द* — *होमिओपॅथिक डॉक्टरांच्या एकजुटीच्या लढ्याला मोठे यश..*
मुंबई, दि. २० ऑगस्ट २०२६ :

सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी प्रक्रियेसंदर्भात आज महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घडामोड झाली आहे.
दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला दिलेले पत्र रद्द करण्यात आले आहे.
त्यामुळे पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणी प्रक्रियेचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे

.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजीचे संबंधित पत्र रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच या प्रकरणासंदर्भात झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर आज दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव मा. श्री. धीरज कुमार यांची होमिओपॅथिक डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली
. यावेळी सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीचा प्रश्न, दि. १८ ऑगस्टच्या पत्रामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच नोंदणी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून, संबंधित पत्र रद्द करण्यात आल्याने एमएमसी नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या शिष्टमंडळामध्ये डॉ. अमोल आंबेकर (राष्ट्रीय अध्यक्ष, इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन), डॉ. योगेश भालेराव (राष्ट्रीय कोषाध्यक्ष, इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन), डॉ. संतोष अवचार (महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समिती), डॉ. बाळकृष्ण गायकवाड (प्रदेशाध्यक्ष, सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र), डॉ. अजय तायडे पाटील (प्रदेश सचिव, सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र), डॉ. प्रकाश राणे (महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समिती), डॉ. अब्रार इनामदार (समन्वयक, इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन), डॉ. निलेश जाधव (महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समिती) आणि डॉ. राहुल काळभोर (HIMA) , डॉ.शिवकुमार यादव, डॉ.सेल्वन सेंथिल कुमार (अध्यक्ष मुंबई महानगर,सीसीएमपी होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन)यांचा समावेश होता.
सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता

. या प्रश्नासाठी राज्यातील विविध होमिओपॅथिक डॉक्टर संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला.
तसेच आंदोलन, शिष्टमंडळांच्या भेटी, शासनस्तरावरील चर्चा आणि विविध माध्यमांतून नोंदणीचा प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात आला
.इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समिती, सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, कॉलेज फेडरेशन तसेच राज्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन्स यांच्या एकजुटीच्या आणि सातत्यपूर्ण लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे.
सर्व संघटनांनी एकत्रितपणे उभे राहून सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला.
या एकजुटीमुळेच दि. १८ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेले पत्र आता रद्द करण्यात आले असून, होमिओपॅथिक डॉक्टरांना न्याय मिळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.या सकारात्मक निर्णयाबद्दल वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव मा. श्री. धीरज कुमार तसेच महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
तसेच उर्वरित सर्व पात्र सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टरांची एमएमसी नोंदणी प्रक्रिया कोणताही विलंब न करता तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

एकजुटीच्या संघर्षाला यश!*सर्व संघटनांच्या एकत्रित लढ्याला यश!**१८ ऑगस्टचे पत्र रद्द — एमएमसी नोंदणीचा मार्ग मोकळा!**होमिओपॅथिक डॉक्टरांच्या न्यायाच्या लढ्याला मोठे यश!*







