राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे अकलूजमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मोठी संधी
अकलूज, (प्रतिनिधी ): आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांची गणितीय क्षमता, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी अबॅकस शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

याच उद्देशाने I-CHAMP ABACUS PVT. LTD. यांच्या वतीने नॅशनल अबॅकस चॅम्पियनशिप २०२६ या भव्य राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी ही एक अभिमानास्पद आणि सुवर्णसंधी ठरणार आहे.
ही स्पर्धा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता स्मृती भवन, शंकर नगर, अकलूज येथे होणार आहे.
देशभरातील विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने अकलूज शहराला राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक उपक्रमाचे केंद्रस्थान लाभणार आहे.
स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेल्या डिजिटल स्टॉपवॉच चॅलेंजमध्ये विद्यार्थ्यांना अवघ्या १० मिनिटांत २०० गणिते सोडवायची आहेत. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या मानसिक गणित कौशल्याची खरी परीक्षा ठरणार आहे. वेगवान विचारशक्ती, अचूक उत्तर देण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि मानसिक एकाग्रता वाढविण्यासाठी या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक सायकल, स्मार्टवॉच, रॉयल नॅशनल ट्रॉफी, मेडल्स तसेच विविध सन्मानचिन्हांची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना I-CHAMP ABACUS PVT. LTD. चे संचालक विशाल माने आणि स्नेहल माने यांनी सांगितले की, “अबॅकस ही केवळ गणित शिकविण्याची पद्धत नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासाचे प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती, विश्लेषण क्षमता आणि तर्कशक्ती विकसित करण्यासाठी अबॅकस अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
.”पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “आज अनेक विद्यार्थी गणित विषयाला घाबरतात. मात्र अबॅकसच्या माध्यमातून गणिताविषयीची भीती दूर होऊन विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण होते. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि देशभरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्याची संधी मिळणार आहे
.”आयोजकांच्या मते, स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक आव्हाने आणि करिअर घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या बौद्धिक कौशल्यांचा विकास होणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश संख्या मर्यादित ठेवण्यात आली असून नोंदणीची अंतिम तारीख २ जुलै २०२६ आहे.
त्यामुळे इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याची नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९८५०७५४००४ किंवा ७२१८१००९०० या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
राष्ट्रीय स्तरावरील या भव्य उपक्रमामुळे अकलूजसह परिसरातील विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असून पालक व विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धेबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.







