औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू
मोहोळ (जि. सोलापूर) : महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मोहोळ येथे प्रवेश सत्र ऑगस्ट २०२६ साठी विविध व्यवसायांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
दहावी उत्तीर्ण व पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत प्रवेश पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थेमध्ये इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन (RACT/MRAC), फिटर, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) तसेच शिवण तंत्रज्ञान (Sewing Technology) या व्यवसायांसाठी प्रवेश उपलब्ध आहेत.
संस्थेत सर्वसाधारण तसेच व्यवस्थापन (Management Seat) कोट्यातील जागा उपलब्ध असून गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवेश अर्ज व शुल्क भरण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे.प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, एसएससी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (लागू असल्यास) व इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत
.प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.अधिक माहितीसाठी संपर्कRACT (MRAC) – चौधरी सर : 9405225367FITTER – तोडेकर सर : 7030733000COPA – खुराडे सर : 9890572027RACT – चव्हाण एस. बी. : 7028610341Sewing Technology – बनसोडे मॅडम : 7249221853Electrician – हिरेमठ सर : 9021540754COPA – ठोंबरे मॅडम : 7066482474Welder – काकडे सर : 9359698921Fitter – बचुटे सर : 9604225515Electrician – खुंदरे पी. डी. : 9011949136प्रवेश प्रमुखसौ. ठाकरे के. बी.मोबाईल : 7720962024
इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा व आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आयटीआय मोहोळमध्ये प्रवेश निश्चित करावा,
असे आवाहन माननीय प्राचार्य श्री संतोष कांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.– औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर.







