*येरमाळ्यात उसळला भक्तीचा महासागर; येडेश्वरी यात्रेत लाखोंची गर्दी.* *आई राजा उदो उदो” च्या जयघोषात १५ ते २० लाख भाविकांची उपस्थिती.*
येरमाळा (प्रतिनिधी) महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून सुप्रसिद्ध असलेली धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्र यात्रे निमित्त मोठ्या उत्साहात आई राजा उदो उदो च्या जय घोषात दुमदुमली येडेश्वरी नगरी.
श्री येडेश्वरी देवीच्या पालखीचे चुन्याच्या रानात आगमन होताच लाखो भाविकांनी मानाची चुनखडी वेचून व पुरणपोळीचा नैवेद्य, फुले पालखीवर अर्पण केली.
येडाईच्या पावन नगरीत भक्तांचा लोटला जनसागर.जवळपास १५ ते २० लाख भाविकांनी वेचली चुनखडी.आई राजा उदो उदो’ चा जयघोष करत हलगी, झांज, संबळ च्या गजरात शुक्रवार दि. ३एप्रिल रोजी येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेत चूनखड़ी वेचण्याचा मानाचा कार्यक्रम विधीवत पार पडला.
चैत्र पौर्णिमेनिमित्त भरलेल्या यात्रेत जवळपास पंधरा लाखांपेक्षा जास्त भाविकांनी येडाई च्या नगरीत हजेरी लावली.
भाविकांच्या अलोट गर्दीमुळे येडाई नगरीमक्तिसागरात न्हाऊन निघाली.
महाराष्ट्रची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवी चा यात्रा महोत्सव चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान पार पडतो.
श्री येडेश्वरी देवीला महाराष्ट्रामध्ये येडेश्वरी चे भक्त येडाई या नावानेही संबोधतात. ही यात्रा पाच दिवसाची असून यात्रा उत्सवातील चुना वेचण्याचा प्रमुख व मानाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला,
यानिमित्त बुधवार पासूनच येरमाळा येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही देवीचे भक्त येरमाळा नगरीत दाखल होते.
आई राजा उदो उदो चा भक्तिभावे जयघोष करत आई येडेश्वरी च्या चैत्र यात्रेसाठी जवळपास सुमारे पंधरा ते वीस लाख भाविकांनी चुन्याचा रानात हजेरी लावली.
आनंदात आणि भक्तिभावाने चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या दरम्यान उदो उदो च्या गजरात येडाई मातेच्या पालखीचे आमराईत आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली.
.भक्तीची ही ओघ आणखीन चार दिवस राहणार आहे. येडेश्वरी मातेच्या मुख्य मंदिरापासून ते अमराई पर्यंत हलगी, झांज, संबळाच्या तालावर व आई राजा उदो उदो च्या नामघोषाने भाविकमंत्र मुग्ध झाले होते.
तसेच गावकरी व भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पालखी मार्गावर काढलेल्या रांगोळी वरून मातेच्या पालखीचे आगमन झाले.
यावेळी असंख्य भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात पालखी आमराई येथील मंदिरामध्ये पोहचली.चुनखडी कार्यक्रम संपन्न झाला.







