*महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार एकनाथ पराडे पाटील यांना जाहीर.*

अकलूज (प्रतिनिधी )बाभुळगाव ता माळशिरस जि सोलापूर येथील श्री एकनाथ पराडे पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागा अंतर्गत देण्यात येणारा २०२४-२०२५ सालचा पुरस्कार शासनाने अधिकृत परिपत्रका द्वारे जाहीर केला
.एकनाथ पराडे हे सोलापूर जिल्हा मधील एकमेव पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत.एकनाथ पराडे हे गेल्या 30 वर्षे पासून गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शना खाली माळशिरस तालुक्यात काम करीत आहेत.
त्यानी बाभुळगाव येथे व्यसनमुक्ती युवक संघाच्या कार्यकर्ते समवेत बाभुळगाव येथे गेल्या 20 वर्षे पासून दारूबंदी केली. गावातील व तालुक्यात व्यसनमुक्ती करणेसाठी प्रसार व प्रचार करीत आहेत. तसेच संघटनेच्या वृक्षारोपण, रक्तदान, व्यसनमुक्ती मध्ये नेहमी सहभाग घेत असतात. त्यानी माळशिरस तालुका व्यसनमुक्ती युवक संघ तालुका अध्यक्ष म्हणून काही वर्षे काम केले आहे.
त्याना हा पुरस्कार जाहीर झाला म्हणून संघटनेचे संस्थापक गुरुवर्य बंडातात्या कराडकर,सचिन शिंदे, विलासबाबा जवळकर,धैर्यशील देशमुख,प्रा.देशमुख सर,दिपक जाधव, सुनिल पाटील व बाभुळगाव मधील सर्व संघटनाच्या पदाधिकऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..







