• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

कृषी यांत्रिकीकरण संदर्भात महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया चालू करा: आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधिमंडळात मागणी

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 9, 2026
in राजकारण
0
कृषी यांत्रिकीकरण संदर्भात महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया चालू करा: आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधिमंडळात मागणी
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृषी यांत्रिकीकरण संदर्भात महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया चालू करा: आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधिमंडळात मागणी

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रियेतील अडचणींचा मुद्दा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्य विधिमंडळात उपस्थित केला.

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन,कृषी यांत्रिकीकरण आदी योजनांसाठी राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.मात्र काही महिन्यांपासून पूर्वसंमती प्रक्रिया बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना साहित्य खरेदी व कामे सुरू करण्यात अडचणी येत असल्याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.

यासोबतच कृषी योजनांच्या मोका तपासणीदरम्यान जिओ-टॅगिंगसाठी प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र लॉगिन वापरावे लागत असल्यामुळे तपासणी व अनुदान वितरण प्रक्रियेत विलंब होत असल्याने सर्व कृषी योजनांचे जिओ-टॅगिंग व मोका तपासणी एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्याची व्यवस्था शासनाने करावी,अशी मागणी त्यांनी केली.

तसेच अनेक योजनांमध्ये लाभार्थी निवड झाल्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यानंतरच बिले अपलोड करण्याची अट असल्यामुळे अनेक पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे पूर्वसंमतीची अट शिथिल करण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी केली.यावर उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की,सन २०२५-२६ मध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ४९,६६,५८३ अर्ज निवडण्यात आले आहेत.त्यापैकी १८,०४,३१७ अर्ज प्रक्रिया टप्प्यात असून आतापर्यंत ७,५७,१३५ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे

.सध्या उपलब्ध निधीनुसार पुढील पूर्वसंमती देण्यात येणार असून कोणताही अर्ज रद्द होणार नाही, निवड झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निवड झालेल्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनाने जास्तीत जास्त निधीची तरतूद करून प्रलंबित अर्जांना तातडीने पूर्वसंमती द्यावी,अशी मागणी केली.

तसेच कृषी योजनांची अंमलबजावणी सुलभ,पारदर्शक व शेतकरी हिताची व्हावी यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याचीही त्यांनी सरकारकडे मागणी केली.

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं…                   .प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला.
आपला जिल्हा

धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं… .प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला.

April 3, 2026
माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ९० कोटीहून अधिक निधीची तरतूद – आमदार रणजितसिंह मोहिते पाटील*
राजकारण

माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ९० कोटीहून अधिक निधीची तरतूद – आमदार रणजितसिंह मोहिते पाटील*

March 8, 2026
Next Post
*मी अकलूज–वेळापूर रस्ता बोलतोय*                          *क्रमशः भाग -24.*

*मी अकलूज–वेळापूर रस्ता बोलतोय* *क्रमशः भाग -24.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!