भारत–संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची नियुक्ती
नवी दिल्ली / प्रतिनिधी :
१८व्या लोकसभेच्या कालावधीसाठी भारताच्या संसदेत स्थापन करण्यात आलेल्या भारत–संयुक्त अरब अमिराती (UAE) संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Lok Sabha अध्यक्षांनी ही नियुक्ती जाहीर केली असून अधिकृत पत्राद्वारे त्याची माहिती देण्यात आली आहे.
भारत आणि United Arab Emirates यांच्यातील संसदीय व राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा मैत्री गट महत्त्वपूर्ण मानला जातो.भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, शिक्षण तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण या विविध क्षेत्रांत घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले आहेत.
संसदीय मैत्री गटाच्या माध्यमातून दोन्ही देशांतील लोकप्रतिनिधींमध्ये संवाद वाढवणे, अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि परस्पर सहकार्य अधिक बळकट करणे हा उद्देश आहे.
नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त करत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, “भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी संसदीय स्तरावर सकारात्मक भूमिका बजावण्याचा मी प्रयत्न करेन. मला ही संधी दिल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो.
”ही नियुक्ती त्यांच्या संसदीय कार्यातील आणखी एक महत्त्वाची जबाबदारी मानली जात असून, त्यांच्या मतदारसंघासाठीही हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.







