पिलीव येथील पहिलीत शिकणाऱ्या जोया ने केला रमजान चा रोजा
अकलूज (प्रतिनिधी )इस्लाम धर्मात रमजानच्या ‘रोजा’ला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येकाला रमजानचे रोजे करणे अनिवार्य असून लहान मुले ही अल्लाह ची भक्ती म्हणून रोजे करत असतात त्याच अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जोया साजिद बागवान (वय 7वर्षे )ही इयत्ता पहिलीत शिकत असून तिने रमजान चा रोजा यशस्वीरित्या पूर्ण केल्याने तिचे कौतुक होत आहे
रमजान या महिन्यात मुस्लिम बांधव अबाल वृद्ध ही रोजे करत असतात पहाटे 5/30 पासून ते सायंकाळी 6/30 वाजे पर्यंत अन्न पाणी वर्ज करून ‘रोजा’च्या वेळात अल्लाचे नामस्मरण करणे महापुण्य असल्याचे मानले जाते.
जोया ने रोजा यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे अनेक नातेवाईक, मित्रमंडळींनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या






