प्राचार्य डॉ. नंदकुमार पाटील राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित
“कुटुंबातील एक तरी व्यक्ती देशसेवेसाठी द्या” – सुभेदार महेंद्र गवई यांचे आवाहन
प्राचार्य डॉ. नंदकुमार पाटील राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित
सामाजिक कार्य हीच खरी देशसेवा समजून प्रत्येक कुटुंबाने देशहितासाठी किमान एक तरी व्यक्ती पुढे करावी, असे प्रेरणादायी आवाहन सुभेदार महेंद्र गवई यांनी केले. पुरस्काराने प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून राष्ट्र घडते, असा मोलाचा संदेशही त्यांनी उपस्थितांना दिला.
साऊ ज्योती सामाजिक संस्था, श्लोक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२६ चा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे येथे उत्साहात पार पडला.या सोहळ्यात देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, मोहोळ येथील प्राचार्य डॉ. नंदकुमार पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार सुभेदार महेंद्र गवई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शंकर अंदानी होते. प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेते बाळराजे वाळूजकर आणि चित्रा दीक्षित उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून प्रा. धाराशिव शिरोळे यांनी मार्गदर्शन केले.विशेष प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक ब्रह्मदेव देशमुख, पोलीस सब-इन्स्पेक्टर विष्णु देशमुख, मुख्य तपासणी अधिकारी (मुंबई) रामजीत गुप्ता, संदीप शर्मा, दीपक बडगुजर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्त्रीरोगतज्ञ व समाजसेविका डॉ. प्रिया देशमुख, सुशीलदत्त बागडे, संस्थेचे उपाध्यक्ष विकास उबाळे तसेच श्लोक फाउंडेशनचे अध्यक्ष रंगाशाही बेजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थाध्यक्ष सचिन हळदे यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड. उमाकांत आदमाने व पूजा आशा दिलीप पाटील यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







