“आय चॅम्प अबॅकस”चा भव्य पारितोषिक वितरण सोहळा ८ फेब्रुवारी रोजी अकलूज येथे
अकलूज
:विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या “आय चॅम्प अबॅकस” संस्थेच्या वतीने भव्य पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी अकलूज स्मृतिभवन येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. सौ. शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील (अध्यक्ष, शिवरत्न शिक्षण संस्था व डॉक्टर मॉम फाउंडेशन), मा. स्वरूपाराणी मोहिते पाटील (अध्यक्ष, प्रताप क्रीडा मंडळ), मा. श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत (माजी शिक्षक आमदार, पुणे), तसेच मा. सयाजिराजे संग्रामसिंह मोहिते पाटील (नगरसेवक, अकलूज नगर परिषद) उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय विविध शाळांचे संस्थापक, अध्यक्ष व शिक्षक यांचीही उपस्थिती लाभणार आहे.या पारितोषिक वितरण सोहळ्यात अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असून ८ विद्यार्थ्यांना सायकल, १० विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या ४५८ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे, पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
अबॅकस शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, गणनाशक्ती आणि आत्मविश्वास वाढत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित होत आहे. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजक विशाल माने व स्नेहल माने यांनी सांगितले आहे.







