• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

तिरंग्याच्या साक्षीने उमलले देशभक्तीचे स्फुल्लिंग महर्षि संकुल यशवंतनगर येथे 77 वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 27, 2026
in शैक्षणिक
0
तिरंग्याच्या साक्षीने उमलले देशभक्तीचे स्फुल्लिंग महर्षि संकुल यशवंतनगर येथे 77 वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा*
0
SHARES
74
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*तिरंग्याच्या साक्षीने उमलले देशभक्तीचे स्फुल्लिंग महर्षि संकुल यशवंतनगर येथे 77 वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा*

यशवंत नगर येथील अग्रगण्य शैक्षणिक महर्षि संकुल येथे 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत दिमाखात आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा करण्यात आला.

विविध विधायक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संकुलाने भारतीय लोकशाहीचा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा केला.

ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी श्री संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग अकलूज, सौ .सुषमा संतोष महामुनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माळशिरस ,श्री. सिद्धार्थ गायकवाड विभागीय सहसंचालक शाखा अमरावती, सभापती अॅड श्री .नितीनराव खराडे ,प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक आठ वाजता संकुलाच्या भव्य प्रांगणात झाली .प्रमुख अतिथी माननीय संतोष वाळके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतांच्या सुरांनी आणि ध्वजगीत व राज्यगीताच्या सुरेल गायणाने संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता. संकुलातील बालवीर व वीरबालाच्या पथकातील छात्रसैनिकांमार्फत ध्वजाला मानवंदना देण्यात आली

.छात्रसैनिकांनी बँड पथकाच्या तालावरील संचलनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तिरंग्याला दिलेली सलामी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुरण चढवणारी ठरली.

संविधान प्रास्ताविकाचे वाचन करत उपस्थित सर्वांच्या मनात संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. शिस्तीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या सामुदायिक कवायतीतून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या शिस्त, समता व एकतेचे दर्शन दिसून आले. व्यासपीठावरील प्रमुख अतिथींचा सन्मान समारंभ संकुलाच्या वतीने संपन्न झाला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हरवलेली मोठी रक्कम प्रामाणिकपणे परत देऊन प्रामाणिकपणाचा झेंडा फडकवणाऱ्या बारावी कला शाखेतील महेश विशाल काळे व ओम संजय सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते संपन्न झाला. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत शिक्षक गटातून प्रथम क्रमांक मिळवलेले योगशिक्षक प्राध्यापक धनंजय देशमुख यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न झाला.

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ आयोजित त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेत महर्षि प्रशालेतील मेघराज तानाजी तांबिले याने सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला याबद्दल प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते सन्मान समारंभ पार पडला.

भारत देशाचा प्रजासत्ताक दिन या विषयावरील इरीना पठाण विद्यार्थिनीच्या ओघवत्या भाषणाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी एकसंघपणा व अनुशासन गुणांचा अवलंब करणाऱ्या मानवी मनोऱ्याचे सुरेख सादरीकरण केले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मेरा मुल्क मेरा देश हे देशभक्तीपर गीत, लक्ष्मीबाई कन्या प्रशालेने आम्ही शिवकन्या स्फूर्ती गीत सादर केले.

महर्षि प्रशालेच्या मुलींच्या लेझीम संघाने महाराष्ट्राची लोकसंस्कृती दर्शवणारे 22 कौशल्यांसह पारंपारिक लेझीम सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

निरक्षरतेचे निर्मूलन करून आत्मनिर्भर व सुशिक्षित भारत घडवण्यासाठी सर्वांमार्फत असाक्षरमुक्त भारत शपथ घेण्यात आली. प्रमुख अतिथी संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांनी आपल्या मार्गदर्शनात संविधानाचे महत्त्व विशद करत लोकशाहीच्या या उत्सवात तरुण पिढीने संविधानातील मूल्ये आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.

कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे, कैलास चौधरी, विनोद जाधव ,नितीन इंगवले देशमुख ,जया गायकवाड ,मुख्याध्यापक शिवाजी पारसे, मुख्याध्यापिका अनिता पवार, उपमुख्याध्यापक आसिफ झारेकरी, पर्यवेक्षक उमेश बोरावके, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, यशवंतनगर परिसरातील नागरीक ,पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी गायकवाड यांनी केले .

सदर कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने झाली.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
सातारा गॅझेट लागू होणार? मराठा आरक्षण वर निर्णय.जिल्हा परिषद निवडणुकांनंतर निर्णयाची शक्यता

सातारा गॅझेट लागू होणार? मराठा आरक्षण वर निर्णय.जिल्हा परिषद निवडणुकांनंतर निर्णयाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In