अकलूज नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
अकलूज (प्रतिनिधी) :-अकलूज नगरपरिषद च्या स्थापनेनंतर प्रथमच निवडणुका होत असून, निवडणूकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती मुख्याधिकारी सुनील पाटील यांनी दिली.
नगर परिषदेच्या सभागृहात अर्ज स्वीकारण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एक असे १३ आणि नगराध्यक्ष पदासाठी एक असे एकूण १४ टेबलची व्यवस्था केली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनाने नगर परिषदेच्या इमारतीत स्वागत कक्षाशेजारी इच्छुक उमेदवार यांना लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्याची सोय केली आहे.तर वरच्या मजल्यावर प्रत्येक प्रभागासाठी एक स्वतंत्र टेबल,तसेच एक नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था केली आहे.
याठिकाणी इच्छुक उमेदवार यांचेकडून आवश्यक कागदपत्रांची पाहणी करून अनामत रक्कम सर्वसाधारण जागेसाठी २००० तर राखीव जागेसाठी १००० रुपये रोख स्वीकारून पावती देण्यात येणार आहे.
10तारखेपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून 13नोव्हेंबर पर्यंत अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही.
अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या आघाडी कडून अनेक इच्छुक आहेत.परंतु अद्याप उमेदवार निश्चित झाले नाहीत.येत्या एक दोन दिवसात उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.







