मराठा समाज अकलूज नगरपरिषद निवडणूक लढविणार
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषद ची निवडणूक जाहीर झाली असून,या निवडणुकीत आता मराठा समाज देखील उतरणार असल्याची माहिती मराठा समाजसेवक आशु ढवळे यांनी दिली.प्रभाग क्रमांक 2,5,7,8,10,12याठिकाणी उमेदवार देण्यात येणार आहेत.यासंदर्भात सर्वांची मते घेऊन दोन दिवसात उमेदवार निवडले जाणार आहेत.अद्याप कोणत्याही आघाडी कडून अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आली नसून कोणत्या प्रभागात कोणत्या गटाकडून कोणता उमेदवार असणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.त्यामुळे इच्छुक उमेदवारची घालमेल होताना दिसत आहे.त्यातच आता अकलूज मधील मराठा समाज देखील निवडणुकीच्या रींगणात उतरणार आहे.







