अकलूज नगरपरिषद ची निवडणूक रंगतदार होणार.
अकलूज (गणेश जाधव)
आशिया खंडातील एक नंबर ची ग्रामपंचायत म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायत व माळेवाडी ग्रामपंचायत चे रूपांतर सलग 43दिवसाचे साखळी उपोषण करून एकत्रितपणे 3ऑगस्ट 2021रोजी नगरपरिषद मध्ये झाले.2011च्या जनगणनानुसार अकलूजची लोकसंख्या 39,919 होती. 2025 मध्ये अंदाजे 55,000. पेक्षा जास्त लोकसंख्या असू शकते.तर 45हजार 124मतदार आहेत. तेव्हा पासून अद्याप नगरपरिषद ची निवडणूक झाली नाही.
परंतु,नुकतीच प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे.लवकरच अकलूज नगरपरिषद ची निवडणूक जाहीर झाली आहे.नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या सोडतीमध्ये अकलूज नगरपरिषद चे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे.अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या १३ प्रभागांतील २६ जागांसाठी नुकतीच आरक्षण सोडत काढण्यात आली.
उमेदवारी अर्ज 10नोव्हेंबर सकाळी 11पासून 17नोव्हेंबर दुपारी 2वाजेपर्यंत अकलूज नगरपरिषद येथे दाखल करता येणार आहेत.18तारखेला अर्जाची छाननी होणार आहे.19ते 21तारखे पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे.काही तक्रार असल्यास 21ते 25दरम्यान अपील करता येईल.26नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.2डिसेंबर रोजी सकाळी 7-30ते 5-30या वेळेत मतदान होणार असून 3डिसेंबर रोजी सकाळी 10वाजलेपासून विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे मतमोजणी होणार आहे.अशी माहिती नगरपरिषद चे मुख्याधिकारी सुनील पाटील यांनी दिली.
नगरपरिषद अंतर्गत एकूण १३ प्रभागांमधील २६ जागांपैकी १३ जागा (५०%) महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेतया १३ जागांसाठी तसेच पुरुषांसाठी राखीव असलेल्या उर्वरित जागांसाठी सोडत काढण्यात आली.प्रभाग क्र. 1-अ -ना. मा. प्रवर्ग.ब -सर्वसाधारण महिला.प्रभाग क्र.2-अ -अनुसूचित जाती महिला. ब-सर्वसाधारण.प्रभाग क्र. 3.अ-अनुसूचित जातीब-सर्वसाधारण महिला.प्रभाग क्र.4.अ-ना. मा. प्रवर्ग.ब-सर्वसाधारण महिला.प्रभाग क्र.5.अ-ना. मा. प्रवर्ग महिलाब-सर्वसाधारण.प्रभाग क्र.6.अ-ना. मा. प्रवर्ग महिलाब-सर्वसाधारण.प्रभाग क्र.7.अ-अनुसूचित जाती महिला.ब-सर्वसाधारण.प्रभाग क्र.8.अ-ना. मा. प्रवर्ग महिलाब-सर्वसाधारण.प्रभाग क्र.9.अ-अनुसूचित जाती.ब-सर्वसाधारण महिला.प्रभाग क्र.10.अ -अनुसूचित जाती महिला. ब-सर्वसाधारण.प्रभाग क्र. 11.अ-अनुसूचित जाती.ब-सर्वसाधारण महिला.प्रभाग क्र. 12.अ-ना. मा. प्रवर्ग महिला. ब-सर्वसाधारण.प्रभाग क्र.13.अ-ना. मा. प्रवर्ग.ब-सर्वसाधारण महिला.याप्रमाणे नगरपरिषद चे आरक्षण आहे.निवडणूक जाहीर झाली असून सोशल मीडियावर सध्या इच्छुकनी अक्षरशः धुमाकूळ सुरु केला आहे.
भावी नगराध्यक्ष, भावी नगरसेवक अशा पोस्ट व्हायरल होत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूक या स्थानिक आघाडी करून होत असतात. असे असले तरी याला राजकीय पक्षाचे देखील पाठबळ असते.
अकलूज नगरपरिषद ची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच निवडणूक होत आहे.यापूर्वी अकलूज ग्रामपंचायत वर स्थापना झालेपासून निर्विवाद पणे मोहिते पाटील गट यांची एकहाती सत्ता होती. प्रत्येक वार्ड मधून मोहिते पाटील सांगतील तोच व्यक्ती सदस्य म्हणून निवडून येत होता. तसेच सरपंच, उपसरपंच देखील ठरत होते.आता मात्र ही पहिलीच निवडणूक असल्याने आजी माजी सरपंच, सदस्य तसेच नवीन कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आपापल्या प्रभागात जाऊन नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत.
या निवडणूक साठी अंदाजे 5ते 6आघाड्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे अनेक महिला इच्छुक आहेत.तसेच अनेक भावी नगरसेवक निवडणूक लढविणार आहेत.अद्याप कोणत्या प्रभागातून कोणत्या आघाडी कढून कोण उभे राहणार आहे. याचे चित्र स्पष्ट झाले नाही.त्याचप्रमाणे अनेकांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली आहे.
अकलूज नगरपरिषद वर आपलीच सत्ता यावी. आणि नगराध्यक्ष देखील आपल्याच गटाचा व्हावा. यासाठी सध्यातरी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.आमच्याच गटाचा नगरसेवक, नगराध्यक्ष होणार. असा दावा केला जात आहे.कोणत्या प्रभागात कोणाला उभे करायचे? नगराध्यक्ष पदासाठी कोण योग्य उमेदवार आहे. याची चाचपणी सुरु आहे.एकूणच, अकलूज नगरपरिषद ची निवडणूक रंगतदार होणार एव्हढे मात्र निश्चित.







