ओबीसी महासंघ नेत्यांचा व मंगळवेढ्यातील १७ सरपंचांचा प्रवेशउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थिती
माळशिरसप्रतिनिधी : रणजितदादा गायकवाड

मुंबई येथील मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते ना.एकनाथ शिंदे व रोजगार हमी फलोत्पादन मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिव तथा सोलापूर जिल्हा संपर्क नेता संजय मिशनकर यांच्या मार्गदशानाखाली माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य व माळशिरस तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांचे नेतृत्वात ओबीसी महासंघ चे संस्थापक अध्यक्ष भिमराव भुसनर, कोअर कमिटी प्रमुख ह.भ.प.आण्णा महाराज भुसनर,तानाजी खोत,आकाश भुसनर,विश्वनाथ करवर,प्रदेशाध्यक्ष राज हाटकर-पाटील, उप प्रदेशाध्यक्ष दिपक चोरमले, प्रदेश कार्याध्यक्ष विठ्ठल झेंडे, सह २२ जिल्हाध्यक्ष वैभव तांबडे यवतमाळ,सतीश पाटील बुलढाणा ,अशोक देवकते पाटील अकोला ,चंद्रकांत पाटील जळगाव ,गोविंद मिजगर पाटील नांदेड,पेमनाथ दोरगे लातूर ,विठ्ठल भंडे परभणी, अमोल करवर पाटील धाराशिव ,विकास बेलदार पाटील सातारा ,दरेश्वर चौगुले सांगली,सूर्यकांत खुळे सोलापूर ,राहुल भुसनर पाटील पुणे, शाम भुसनर मुंबई ,धनंजय पाटील छत्रपती संभाजी नगर,सरोजीत निळे बीड ,राहुल बेलदार पाटील धुळे,धनाजी काळे कोल्हापूर, दत्तात्रय बोराडे जालना , महादेव गडदे हिंगोली, लक्ष्मण बोगीर नाशिक, संजय भुसनर वर्धा,औदुंबर बंडगर सोलापूर यांच्या सह १२० तालुकाध्यक्ष यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील सतरा विद्यमान सरपंच ८० ग्रामपंचायत सदस्य यामध्ये येड्राव गावचे सरपंच संजय पाटील, पौट गावचे सरपंच हरी हिप्परकर, निंबोणी गावचे सरपंच बिरदेव घोगरे ,जालिहाळ गावचे सरपंच सचिन चौगुले ,आंधळगावचे सरपंच लहुजी लेंडवे ,खूपसुंगी गावचे सरपंच आनंद पडवळे, सोडडी गावचे सरपंच विनोद बिराजदार,लेंडवेचिंचाळे गावचे सरपंच प्रमोद लेंडवे ,गणेशवाडी गावचे सरपंच आबासाहेब लांडे,महमदाबाद शे.गावचे सरपंच सचिन बोडके, हजापुर गावचे सरपंच माधवनंद आकळे,शेलेवाडी गावचे सरपंच मनोज चव्हाण,अकोला, गावचे सरपंच अमोल सरवदे,खोमनाळ गावचे सरपंच चंद्रकांत इंगळे,बावची गावचे सरपंच राजु गाढवे, डिकसळ गावचे सरपंच दरलिंग शिंदे, देगाव गावचे सरपंच शशिकांत ढेकळे यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असुन मंगळवेढा तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातील महामळावा घेऊन शिवसेना या पक्षाचा वाढ विस्तार करण्यात येणार असून मंगळवेढा तालुक्यातील इतर सरपंचांना सोबत घेऊन भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लढवल्या जातील असे सर्व सरपंचांनी सांगितले.चौकट मागील तीन वर्षाच्या काळात तात्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी जे निर्णय समाज हिताची गीत अनेक योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचं काम आहे अशा विविध कल्याणकारी योजना आम्ही सर्व सरपंच प्रभावितो साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून भविष्यात तालुक्यात भगवा चित्र पाहायला मिळेल असा आशावाद यावेळी व्यक्त केला.आबासाहेब लांडे सरपंच गणेशवाडी
चौकट….*
संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो असे एकमेव मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आज पक्ष प्रवेश केला असून हटकर समाजाच्या विविध मागणी आहेत त्या मागण्या लवकरच पूर्ण करतील असा विश्वास तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना ओबीसी महासंघाच्या 1000 पेक्षा अधिक उद्घाटनांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे
*भिमराव भुसणर संस्थापक ओबीसी महासंघ महाराष्ट्र-राज्य
चौकट…*
ओबीसी महासंघाचे संस्थापक व त्यांची सर्व पदाधिकारी त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील १७ विद्यमान सरपंच ८० ग्रामपंचायत सदस्यांनी जो पक्ष प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केला आहे*. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची मोठी ताकद पाहिला मिळेल, तसेच भविष्यातील जिल्हा परिषदेच्या व पंचायत समिती ,स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लढवणार असून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय कार्यकर्ते शांत बसणार नाहीत.
सतिश सपकाळ माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती सोलापूरतालुकाप्रमुख शिवसेना माळशिरस







